शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाची माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी. |
शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित आविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी संशोधकांकडून त्यांच्या संशोधनाची माहिती घेताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आदी. |
कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट यांच्या वतीने संयोजित ‘आविष्कार २०१८-१९’ या संशोधनविषयक स्पर्धेचे उद्घाटन कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. विद्यापीठाच्या लोककला सभागृहात झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, समन्वयक तथा अधिष्ठाता डॉ.ए.एम.गुरव, डॉ. पी.एस. पाटील उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर
त्यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी सहभागी संशोधक विद्यार्थ्याकडे जाऊन त्यांच्या
प्रकल्पांविषयी जाणून घेतले. विविध अभिनव विषयांवरील सादरीकरण विद्यार्थ्यांनी
केल्याचे पाहून कुलगुरू डॉ. शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आणि सहभागी संशोधकांचे
अभिनंदनही केले.
शिवाजी विद्यापीठांतर्गत जिल्हास्तरीय, पदव्युत्तर व मध्यवर्ती अशा या त्रिस्तरीय संशोधन स्पर्धेला संशोधक विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. आजच्या
स्पर्धेत सुमारे दोनशे संशोधकांनी सहभाग दर्शविला. भाषा, ललितकला, शिक्षणशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, कायदा, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि वैद्यक व औषधनिर्माण शास्त्र अशा विविध विषयांमधील शोधनिबंध, पोस्टर सादीकरण, पॉवरपॉईंट सादरीकरण आणि मॉडेल्स अशा विविध प्रकारांत त्यांनी आपले संशोधन
मांडले. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच एम.फील.व पीएच.डी.चे संशोधन करणारे संशोधक विद्यार्थी, शिक्षक स्पर्धेत सहभागी झाले. दरम्यान, शुक्रवार दि. ४ जानेवारी २०१९ रोजी विद्यापीठात आयोजित आविष्कार स्पर्धेत पदवी स्तरावरील संशोधक विद्यार्थ्यांबरोबरच आजच्या स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या पदव्युत्तर स्तरावरील स्पर्धकही सहभागी होणार आहेत, अशी माहिती समन्वयक डॉ. गुरव यांनी दिली.
No comments:
Post a Comment