कोल्हापूर, दि. ५ एप्रिल: कोरोना विषाणूच्या
साथीच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये विविध प्रकारच्या मानसिक स्वास्थ्याशी निगडित
समस्या उद्भवत असल्याची बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने संबंधित नागरिकांसाठी
विशेष हेल्पलाईन निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासनाच्या मान्यतेने
आणि सहकार्याने सदर समुपदेशन हेल्पलाईन लवकरच कार्यान्वित करण्यात येत आहे. गरज
भासल्यास प्रत्यक्ष समुपदेशनही करण्यात येणार आहे. ही माहिती कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांनी दिली आहे.
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या
माहितीनुसार, कोरोना विषाणूची साथ आणि त्या अनुषंगाने देशात उद्भवलेली अभूतपूर्व
परिस्थिती यामुळे नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून
मानसिक व्याधीची सुरवात या कालावधीमध्ये होऊ शकते. त्याचा परिणाम शारीरिक
स्वास्थ्यावरही होण्याची शक्यता असते. तथापि, अशा परिस्थितीत जर प्राथमिक
टप्प्यावरच योग्य व शास्त्रशुद्ध समुपदेशन मिळाले, तर व्यक्तीची सकारात्मकता वाढून
त्याचा मानसिक आजारापासून बचाव करता येऊ शकेल. ही बाब लक्षात घेऊन कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या एम.एस.डब्ल्यू. अधिविभागाचे
प्रा. अमोल मिणचेकर समन्वयाने नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्याकरिता फोन-इन
समुपदेशन उपक्रम राबविण्यात येणार आहे. शासनाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे आदेश,
समुपदेशनाची व्यावसायिक मूल्ये आणि प्रतिबंधात्मक दक्षता घेऊन सदर समुपदेशन
करण्यात येणार आहे. सदर उपक्रमात सहभागी शिक्षक, विद्यार्थी हे जिल्हा
प्रशासनाच्या मान्यतेने गरज भासल्यास प्रत्यक्ष समुपदेशनासाठीही जातील.
सदर समुपदेशनासाठी आवश्यक अशी कार्यप्रणाली आणि
मार्गदर्शक तत्त्वांचीही निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, विद्यापीठात
एमएसडब्ल्यू शिकविणारे शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी अशी एकूण ३० जणांची
टीम हेल्पलाईनद्वारे संचारबंदी कालावधीत योग्य ती दक्षता घेऊन समुपदेशन उपक्रम
राबवेल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सदर विद्यार्थ्यांना ओळखपत्रे
दिली जातील. सदर हेल्पलाईन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यान्वित राहील. या
सर्व प्रणालीची माहिती हेल्पलाईन क्रमांकांसह विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून व
समाजमाध्यमांतून उपलब्ध केली जाईल.
नागरिकांच्या मानसिक
स्वास्थ्यासाठी समुपदेशन आवश्यक: कुलगुरू डॉ. शिंदे
कोरोना विषाणूच्या साथीमुळे आणि त्या अनुषंगाने
उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे नागरिक मोठ्या दडपणाखाली तसेच भीती, असहायता आणि निराशेच्या
भावनेने ग्रस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत संवाद हा अतिशय
महत्त्वाचा उपाय आणि उपचार आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाने आपल्या
एमएसडब्ल्यू अधिविभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी
समुपदेशन हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी उद्भवलेल्या महापूर
स्थितीमध्ये सुद्धा अनेक नागरिक अशा प्रकारे नैराश्यग्रस्त झाले होते. त्यावेळीही
विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यू विभागाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांना संबंधित
नागरिकांचे समुपदेशन करून त्यांचे मानसिक पुनर्वसन करण्यात मोलाची कामगिरी यशस्वीपणे
बजावली होती. यावेळीही विद्यापीठ त्याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हेल्पलाईन
सुरू करीत आहे. त्याचा नागरिकांना निश्चितपणे लाभ होईल, अशी खात्री आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या
कोरोनाविषयक समुपदेशनासाठी नियुक्त समुपदेशकांची नावे व संपर्क क्रमांक
पुढीलप्रमाणे:-
१. प्रा. अमोल मिणचेकर (समन्वयक) – 9822567720
२. विनोद ठिकणे – 9552127209
३. मोहिनी देवकर – 9145609647
४. सागर अवलक्की – 8600736147
५. भैय्यासाहेब नलवडे – 9970965570
६. स्नेहल जगदाळे – 7875137503
७. नागेश पवार – 8788323500
८. रागिणी बालुगडे – 7420979975
९. पृथ्वीराज शेटे – 8830829301
१०. सिद्धांत घोरपडे – 8830982805
११. रेणुका देशमुख – 9421690358
१२. सुशील कांबळे – 9168181595
१३. शुभांगी मदने – 7066082819
१४. ऋतुजा
चौत्रे – 7798146776
१५. गणेश भाड – 9552010520
१६. सौरव वाघमारे – 9764891097
१७. अक्षय बुगडे – 9158505182
१८. दिनेश माळी – 9637096912
१९. अमित सोनवणे – 9518553826
२०. प्रियांका
बनसोडे – 9970864960
२१. आप्पासाहेब पाटील - 7219185983
२२. वंदना चव्हाण – 7083644644
२३. रागिणी
शेट्ये – 8830169662
२४. जयदीप गुरव – 7522978707
२५. शिवाली दामुगडे – 9823491722
२६. अमोल मस्के - 8530585952
No comments:
Post a Comment