कोल्हापूर, दि. २३
एप्रिल: भारतीय अस्पृश्यतेच्या
प्रश्नाचे गाढे अभ्यासक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी
विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते महर्षी
शिंदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल
रामजी शिंदे अध्यासनाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, मराठी अधिविभागाचे डॉ. नंदकुमार
मोरे, उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून
हा कार्यक्रम करण्यात आला.
No comments:
Post a Comment