कोल्हापूर, दि. १४
एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना
अभिवादन करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पूर्णतः पालन करीत जयंती साजरी करण्यात
आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेस कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते
पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत आदी उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment