कोल्हापूर, दि. १५
ऑक्टोबर: भारताचे माजी
राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती
आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यांच्या हस्ते डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन
पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इलेक्ट्रॉनिक्स
अधिविभागाचे डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव,
बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, तंत्रज्ञान
अधिविभागाचे संचालक डॉ. जय बागी, डॉ. अजित कोळेकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक
अभय जायभाये यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment