कोल्हापूर, दि. २५ नोव्हेंबर: भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना पुण्यतिथीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटमध्ये
यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी अभ्यास
केंद्राच्या प्रमुख डॉ. भारती पाटील, चव्हाण स्कूलचे सुधीर देसाई, उमेश गडेकर,
गजानन साळुंखे, डॉ. नितीन माळी, अमोल मिणचेकर, डॉ. वैशाली भोसले आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment