शिवाजी विद्यापीठात शहीद दिनानिमित्त शहीदांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी. |
कोल्हापूर, दि. २६
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात आज
संविधान दिन आणि शहीद दिन या निमित्ताने भारतीय संविधानकर्ते आणि वीर शहीद जवान यांच्या
पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी.
शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते संविधानाची प्रास्ताविका,
संविधानाची मूळ प्रत यांना अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रास्ताविकेचे
सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी २६/११च्या मुंबईवरील
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांसह अन्य शहीदांच्या स्मृतिप्रतिमांनाही कुलगुरू
डॉ. शिर्के यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.
यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, वित्त व लेखाधिकारी
व्ही.टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत,
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या
संचालक डॉ. नमिता खोत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, डॉ. पी.एन.
वासंबेकर, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. निखील गायकवाड, डॉ. ए.एम. सरवदे, डॉ. वर्षा जाधव,
डॉ. डी.बी. सुतार, डॉ. पी.बी. बिलावर, डॉ. शिवराज थोरात यांच्यासह प्रशासकीय अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment