बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रात करिअरच्या संधी; एक वर्षाची पूर्ण अप्रेंटिसशीप
कोल्हापूर, दि. ४ जुलै: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विविध अभिनव अभ्यासक्रम
राबविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाने या वर्षीपासून बी.कॉम. (बीएफएसआय) हा आणखी एक
अभिनव आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी आज दिली.
डॉ. महाजन यांनी
दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी
विद्यापीठाने
राष्ट्रीय
शैक्षणिक
धोरणाच्या
अनुषंगाने
विद्यार्थ्यांची
रोजगाराभिमुखता
वाढविण्यासाठी
नवीन
अभ्यासक्रम
सुरू
करण्याचे
धोरण
राबविले
आहे. याअंतर्गत अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह
पदवीस्तरीय आणि एकात्मिक अभ्यासक्रमही राबविण्यास प्रारंभ केला आहे. त्यांना
विद्यार्थ्यांचा प्रतिसादही लाभतो आहे. या अभिनव अभ्यासक्रमांच्या मालिकेतच
विद्यापीठाने यंदापासून वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाच्या अंतर्गत बी. कॉम. (बीएफएसआय) हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस (वित्तीय सेवा) आणि इन्शुरन्स (विमा) या
दैनंदिन व्यावहारिक जीवनातील अत्यावश्यक सेवा आहेत. त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण घेऊन
या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ
शकतात. त्या दृष्टीने विद्यापीठाने सदर अभ्यासक्रमाची रचना केलेली आहे. विद्यार्थ्यांना
प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेता यावा, यासाठी या अभ्यासक्रमामध्ये एक वर्षाच्या अप्रेंटिसशीपचाही समावेश करण्यात आला
आहे. त्यामुळे
विद्यार्थ्यांना
रोजगाराची
हमी
मिळण्याची
अधिक शक्यता निर्माण होईल. त्यासाठी विद्यापीठाने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन यांच्यासमवेत सामंजस्य करार केला आहे. तसेच, सेक्टर स्किल कौन्सिल यांच्यासोबतही करार करण्यात आला आहे. या संस्था, संघटनांचे विद्यापीठास अप्रेंटीसशीपसह प्लेसमेंट आणि कौशल्य मूल्यमापन आदी बाबींसाठी सहकार्य लाभणार आहे. कौशल्याधारित आणि अनुभवाधिष्ठित अध्ययनाला महत्त्व असणाऱ्या या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध वित्तीय सेवा क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये बँकिंग, अकाऊंटिंग, ऑडिटिंग, इन्शुरन्स यांसह विविध वित्तीय सेवा संस्थांमध्येही
करिअरच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन इच्छुक विद्यार्थ्यांनी आपल्या
करिअरला वेगळी दिशा द्यावी, असे आवाहनही अधिष्ठाता डॉ. महाजन यांनी केले आहे.
बी.कॉम. (बी.एफ.एस.आय.) अभ्यासक्रमाची ठळक
वैशिष्ट्ये-
1) पश्चिम महाराष्ट्रातील पहिला अप्रेंटिसशीप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (ए.ई.डी.पी.)
2) कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेशास पात्र
3) विद्यार्थ्यांना पूर्ण एक वर्षाची अप्रेंटिसशीप
4) प्रत्येक सत्रामध्ये कौशल्यावर आधारित अध्यापन-अध्ययनावर भर
5) औद्योगिक क्षेत्राच्या मागणी व गरजेनुसार तयार केलेला अभ्यासक्रम
6) अप्रेंटिसशिपसह नोकरी व रोजगार मिळण्याच्या अधिक शक्यता
No comments:
Post a Comment