Tuesday, 23 July 2024

लोकमान्य टिळक यांना विद्यापीठात अभिवादन

 



कोल्हापूर, दि. २३ जुलै: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवन इमारतीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. विद्या कट्टी, डॉ. सुभाष कोंबडे, डॉ. शशिकांत पंचगल्ले, डॉ. मच्छिंद्र गोफणे, उपकुलसचिव डॉ. प्रमोद पांडव, गजानन पळसे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment