कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर:
डॉल्बीमुक्त आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी
कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. या प्रयत्नांना
साथ देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग विभागानेही आपला वाटा
उचलला आहे. याअंतर्गत विभागाची विद्यार्थिनी साक्षी वाघमोडे हिने तयार केलेल्या
जनजागृतीपर रीलची जिल्हा पोलिसांनी दखल घेत ती आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून
प्रसारित केली आहे.
गणेशोत्सवातील डॉल्बीचा दणदणाट आणि
त्यामुळे होणारे ध्वनीप्रदूषण टाळावे, तसेच
पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, हा
या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या रीलमधून डॉल्बीला टाळून पारंपरिक वाद्यांना
प्रोत्साहन देण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला आहे. या जनजागृतीपर रीलच्या
स्क्रिप्टचे लेखन बी.ए. फिल्म मेकिंग कोर्सचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव आणि शिक्षक
अनुप जत्राटकर यांनी केले. अवधूत चव्हाण याने संकलन केले. विद्यार्थ्यांनी फिल्म
मेकिंगच्या अभ्यासक्रमातून आत्मसात केलेल्या दृक्-श्राव्य कौशल्याचा उपयोग सामाजिक
जनजागृतीसाठी केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या आशयगर्भ रीलची कोल्हापूर
जिल्हा पोलीस प्रशासनाने दखल घेत आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरून तिचा प्रसार
केला. https://www.instagram.com/reel/Dci_SN3jYEL/?igsi=MXd4cTBpN2JzaWV1Nw==
अशी या
रीलची लिंक आहे. ‘गणेशोत्सवाचा उत्साह असू द्या… पण
डॉल्बीचा दणदणाट नको!’ या संदेशातून ध्वनीप्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक
आणि जबाबदारीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन या रीलमधून करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत,
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल
विभागाचे अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment