Showing posts with label Gadge Baba. Show all posts
Showing posts with label Gadge Baba. Show all posts

Tuesday, 23 February 2021

शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांची जयंती

 


कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा यांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, एमबीए अधिविभागाचे संचालक डॉ. एच.एम. ठकार, अधिसभा सदस्य डॉ. एस.डी. डेळेकर यांच्यासह एम.बी.ए., रसायनशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.