शिवाजी विद्यापीठातील क्रीडा संकुल परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपण प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत उपस्थित मान्यवर, अधिकारी, सेवक आदी. |
कोल्हापूर, दि. १
जुलै: महाराष्ट्र शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत आज शिवाजी
विद्यापीठात सुमारे तेरा हजार रोपांच्या लागवडीस जिल्ह्याचे पालकमंत्री
चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
गेल्या दोन
वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत शिवाजी
विद्यापीठाने प्रभावी कामगिरी बजावली आहे. लावलेल्या वृक्षांचा जगण्याचा दरही ९०
टक्क्यांच्या घरात आहे. त्यामुळे वृक्ष लागवडीबरोबरच वृक्षांची जोपासना करण्याच्या
बाबतीतही शिवाजी विद्यापीठाचा लौकिक आहे. यंदाही विद्यापीठाने वन विभाग व सामाजिक
वनीकरण विभागाच्या सहकार्याने परिसरात तेरा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून
त्याचा प्रारंभ आज सकाळी पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यापीठाच्या
सिंथेटिक ट्रॅक परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य वन संरक्षक
अरविंद पाटील, उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ल, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक
सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अनेक
शासकीय अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
क्रीडा संकुल परिसरातही वृक्षारोपण
क्रीडा संकुल परिसरातही वृक्षारोपण
विद्यापीठाच्या
क्रीडा संकुल परिसरात जांभूळ व पिंपळ वृक्षांची लागवड कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व
प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ.
पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही.
गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, क्रीडा अधिविभाग प्रमुख
डॉ. पी.टी. गायकवाड, अधिसभा सदस्य यशवंत भालकर, डॉ. संजय जाधव, डॉ. एन.बी. गायकवाड
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment