Friday, 20 July 2018

प्रसिध्द मोतीबाग तालीमीच्या मल्लविद्येने तैवानचे शिष्टमंडळ प्रभावित



कोल्हापूर, दि.19 जुलै - शिवाजी विद्यापीठामध्ये क्रीडाविषय माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी  तैवान येथून आलेल्या त्सिंगहुआ राष्ट्रीय विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने आज भेटीच्या दुसऱ्या दिवशी कोल्हापूरातील मंगळवार पेठ येथील सुप्रसिध्द मोतीबाग तालीमेस भेट दिली.  यावेळी पैलवानांनी दाखविलेले प्रात्यक्षिके पाहून तैवान विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे अधिकारी प्रा.सिअँग लियू,  प्रा.हयुॲग यू हे अत्यंत प्रभावित झाले.  यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर तसेच कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे प्रतिनिधी माजी महापौर महादेवराव अडगुळे, संभाजी वरूटे, पै.संभाजी पाटील, हिंद केसरी दीनानाथ सिंह, दादू चौगुले, विनोद चौगुले आदी उपस्थित होते.  मल्लविद्येची शास्त्रोक्त माहितीसह या प्रात्यक्षिकांमध्ये कुस्तीपटटूंनी करेलाचा वापर, ढाक लावणे, धोबी पछाड, मोळी आदी डावांचे सादरीकरण केले.


तत्पूर्वी, सकाळी विद्यापीठ परिसरामध्ये विविध ठिकाणी निर्माण केले जलसाठे पाहून शिष्टमंडळ अचंबित झाले. तद्नंतर, शिष्टमंडळाने सेंट झेवीयर्स शाळेस भेट दिली.  या ठिकाणी बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्केटींग, फुटबॉल, बासकेटबॉल, क्रिकेट आदी खेळांच्या मैदांनासह विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. छत्रपती शहाजी महाराज संग्रहालयाच्या पाहणीनंतर आष्टा येथील आण्णासाहेब डांग महाविद्यालयामधील विविध क्रीडा विषयकबाबींची माहिती घेण्यासाठी शिष्टमंडळ आष्टयाकडे रवाना झाले.

-----

No comments:

Post a Comment