शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासमवेत अन्य मान्यवर. |
शिवजयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत अन्य अधिकारी. |
शिवाजी विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त सादरीकरण करताना विद्यार्थिनींचे झांजपथक. |
कोल्हापूर, दि. १९ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज
शिवजयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
विद्यापीठात आज
सकाळी साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठ ध्वजास
वंदन करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांच्यासह मान्यवरांनी शिवप्रतिमेचे पूजन केले.
ध्वजवंदनानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी भवनच्या
विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या झांज, ढोलताशा व लेझीम पथकांनी यावेळी मान्यवरांसमोर
नेत्रदीपक सादरीकरण करून वातावरणात रंग भरला. त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या भव्य पुतळ्याला पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी प्र-कुलगुरू
डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी.
पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ.
पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी
विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. अभय
जायभाये, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, आयक्यूएसी संचालक डॉ. आर.के.
कामत, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या समन्वयक डॉ. नमिता खोत
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
संत रविदास यांना अभिवादन
दरम्यान, या
कार्यक्रमानंतर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये संत रविदास यांच्या
जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के
यांच्या पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींनाही अभिवादन करण्यात आले.
No comments:
Post a Comment