कोल्हापूर, दि. ३० एप्रिल:
शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते
संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात
आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील,
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी
विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, हिंदी अधिविभाग प्रमुख डॉ. अर्जुन
चव्हाण यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment