इंद्रजीत सावंत |
कोल्हापूर, दि. ५
जून: शिवाजी विद्यापीठातर्फे शिवस्वराज्य दिनानिमित्त
उद्या (६ जून) सकाळी १० वाजता प्रख्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचे ‘शिवस्वराज्य’ या विषयावरील विशेष ऑनलाईन
व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’
युट्यूब वाहिनीवरुन प्रसारित होणाऱ्या या व्याख्यानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे
आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.
कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर, शिवस्वराज्य दिन साजरा होत असल्याने
विद्यापीठातर्फे इंद्रजीत सावंत यांचे ‘शिवस्वराज्य’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. शिवाजी
विद्यापीठाच्या ‘शिव
वार्ता’ (https://www.youtube.com/c/ShivVarta) या वाहिनीवरून https://youtu.be/mh366COs_nw या लिंकद्वारे ते सकाळी १० वाजता
प्रसारित होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू
डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करण्यात येईल. कोविड-१९ साथीमुळे शासन
निर्देशांचे पालन करीत सदर कार्यक्रम साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याचेही
कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment