Sunday, 21 June 2026

योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पध्दती - खासदार धनंजय महाडिक

 


कोल्हापूर, दि.21 जून - योगसाधना ही भारतीयांची प्रमुख जीवन पध्दती झालेली आहे.शरीर आजारमुक्त करण्याचा एकमेव उपाय म्हणजे योगसाधना. भारताच्या प्राचीन परंपरेत हजारो वर्षांपासून योग अभ्यास केला जातो. हे आपणा सर्वांबरोबरच आपल्या पुढच्या पिढीसाठीही उपयुक्त आहे. शिवाजी विद्यापीठामध्ये बारावर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहाने आणि उपस्थितांच्या मोठया संख्येने साजरा केला जातो.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या प्राचीन परंपरेला 2014 सालापासून आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करून देण्याचे मोठे कार्य केलेले आहे.जगभरातील जवळपास 130 देशांमध्ये योगदिन साजरा केला जातो.भारतामध्ये काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत साठ हजार ठिकाणी योगदिन साजरा होतो, असे उद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठात आज 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'निरोगी वृध्दत्वासाठी योग' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना खासदार महाडिक बोलत होते.यामुळे कुलगुरू डॉ.राजनीश कामत, प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव प्रमुख उपस्थित होते.



भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाद्वारे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 'निरोगी वृध्दत्वासाठी योग' हा उपक्रम देशभरात साजरा करण्यात येत आहे.या उपक्रमात शिवाजी विद्यापीठ सहभागी झाले.यासाठी सुमारे 575 योगसाधकांनी नोंदणी केली आणि आजच्या उपक्रमात सहभागही दर्शविला.विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभाग, आजीवन अध्ययन आणि विस्तार अधिविभाग, क्रीडा शारीरिक शिक्षण अधिविभाग, विद्यार्थी विकास विभाग, रगेडीयन फिटनेस, आदित्य बिर्ला ग्रुप 'इंदिरा'यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.





यावेळी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, विद्यापीठात 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसापासून म्हणजे दि.21 जून, 2015 पासून गेली 12 वर्षे सलग दैनंदिन स्वरूपात विद्यापीठात मोफत योग शिबीर घेतले जाते.या उपक्रमाचा दैनंदिन जवळपास 250 साधक लाभ घेतात.योगसाधना आणि योगसाधकांच्या माध्यमातून विद्यापीठ हे जगी गरजू दे. आपला भारत देश जगामध्ये अनेक बाबतीत अग्रेसर होत आहे.त्यातीलच एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे योगसाधना.योगसाधना अबाल, वृध्द सर्वांसाठीच लाभदायक आहे. त्याचबरोबर, निरोगी वृध्दत्वासाठीही फार महत्वाची ठरलेली आहे. योग ही एक व्यापक प्रणाली आहे जी संपूर्ण व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक कल्याणास फायदेशीर आहे. योगाचा आपल्या जीवनात दररोज समावेश केल्यास आपण असंख्य फायदे अनुभवू शकतो.


शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये आज सकाळी 6.15 ते 8.15 या कालावधीत योगसाधना शिबीर पार पडले.कुलगुरू डॉ.कामत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ.कबीर खराडे, विद्यार्थी विकास विभागाचेसंचालक डॉ.एस.जी.घाणे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ.रामचंद्र पवार, रगेडीयनचे आकाश कोरगावकर, राज कोरगावकर, अझरूद्दीन मुल्ला, आदित्य बिर्ला ग्रुप 'इंदिरा'चे परशराम पाटील यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय सेवक यांच्यासह नागरिक, एम.ए.(योगशास्त्र), बी.ए. (स्पोर्टस्) विभागांसह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी या योगसाधना शिबिरात सहभागी झाले.योगशिक्षक सूरज पाटील यांनी उपस्थितांना योगसाधनेचे प्रशिक्षण दिले.सूत्रसंचालन निलम जाधव यांनी केले.विद्यार्थी विकास विभागाचेसंचालक डॉ.एस.जी.घाणे यांनी आभार मानले.नाश्ता चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाने प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोलकाता येथून संपूर्ण देशाला संबोधित केले.निरोगी वृध्दावस्थेसाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे.योग केवळ वृध्दांसाठी नाही, तर सर्व वयोगटातील लोकांसाठी आहे.योग फक्त शारीरिक व्यायामापुरता मर्यादित नसून तो मानसिक आरोग्याचाही मार्ग आहे.यावेळी त्यांनी योगाचे महत्व, मानवी जीवनातील त्याचे स्थान आणि संतुलित जीवनशैली यावर प्रकाश टाकला.नागरिकांना योग दररोजच्या दिनचर्याचा भाग बनवण्याचेही आवाहन केले.पंतप्रधान मोदी यांच्या या संबोधनाचे थेट प्रक्षेपण यावेळी सभागृहात करण्यात आले.त्यांचे संबोधन संपल्यानंतर योग प्रात्यशिक्षकांना सुरूवात झाली.

-----


No comments:

Post a Comment