कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी छत्रपती
शाहू महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या
वातावरणात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय
इमारतीमध्ये आज सकाळी कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून
अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्र येथेही
शाहू महाराजांच्या भव्य तैलचित्रास कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव
यांच्या हस्ते पुष्पहार वाहून अभिवादन करण्यात आले.
तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ.
जाधव यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर
यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या शाहू जन्मस्थळी भेट देऊन शाहू
महाराजांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले. त्यानंतर दसरा चौक येथील शाहू
महाराजांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.
विद्यापीठातील अभिवादन कार्यक्रमास शाहू संशोधन
केंद्राच्या प्रभारी संचालक डॉ. मंजुश्री पवार यांच्यासह इतिहास अधिविभाग प्रमुख
डॉ. अवनीश पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजाराम गुरव,
क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, अंतर्गत
गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण
केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, अधिसभा सदस्य अॅड.
अभिषेक मिठारी, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. निखिल गायकवाड, डॉ.
मुरलीधर भानारकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. नीलेश बनसोडे, कास्ट्राईबचे
आनंद खामकर, डॉ. उत्तम सकट, डॉ. अविनाश भाले, डॉ. दत्तात्रय मचाले, यश आंबोळे
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment