| शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना समाजकल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. जगन कराडे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. |
कोल्हापूर, दि. ३ जानेवारी: व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणारे विद्यार्थीच यशोशिखर गाठू शकतात. ज्ञान मिळविणे म्हणजे मनुष्य जीवन सुफल करणे होय. अभ्यास सगळेच परीक्षार्थी करतात; परंतु खरे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न खूप कमी विद्यार्थी करतात, असे मत समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी काल येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सेवा पूर्व मार्गदर्शन केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 'स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना' या विषयावरील विशेष व्याख्यानात विशाल लोंढे बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले, स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी जागतिक चालू घडामोडींचा अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. आजचा सूज्ञ विद्यार्थीच उद्याचा चांगला समाज निर्माण करु शकतो.
सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिन कदम यांनी परिचय करुन दिला. अमित कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्यानास स्पर्धा परीक्षार्थींचा अत्यंत भरघोस प्रतिसाद लाभला.
No comments:
Post a Comment