Wednesday, 4 October 2017

शाश्वत जैवसंवर्धन लोकसमुदायास लाभदायक: डॉ.विलास बर्डेकर




शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. विलास बर्डेकर. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. एम.व्ही. शांताकुमार, डॉ. पी.डी. राऊत, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि डॉ. ए.डी. जाधव.


Dr. Vilas Bardekar (Rtd. IFS)
कोल्हापूर, दि. ऑक्टोबर: जैवसंवर्धनासाठी शाश्वत प्रयत्न करीत राहिल्यास अंतिमतः ते मानवी समुदायासाठी लाभदायक ठरणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे (नागपूर) अध्यक्ष भारतीय वन सेवेचे (निवृत्त) अधिकारी डॉ.विलास बर्डेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभाग महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, वन विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय जैवविविधता संवर्धन आणि जागृत या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी द्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के उपस्थित होते.
डॉ. बर्डेकर म्हणाले, आपण सणांच्या नावाखाली पर्यावरणाचा, झाडापानांचा जो नाश करतो, तो टाळण्यासाठी लोकजागृती करणे आवश्यक आहे. जडीबुटी विकणाऱ्या लोकांकडील ज्ञानही जतन करणे आवश्यक आहे. आपल्याकडील ज्ञान, संशोधनाचे इतर देशांत खू मोठ्या प्रमाणात संवर्धन होते. आपल्या देशात मात्र तसे होत नाही. त्या दृष्टीनेही आपण सदैव जागरू राहणे आवश्यक आहे.
शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा जैवविविधतेचा वारसा जोपासणारा आहे. या परिसरात विविध प्रकारची फुलपाखरे स्वच्छंदपणे विहार करताना आढळली. त्यामुळे हा परिसर खऱ्या अर्थाने बटरफ्लाय पार्क आहे, असे कौतुकोद्गारही बर्डेकर यांनी काढले.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरु डॉ. शिर्के म्हणाले, जैवविविधतेच्या संवर्धना स्थानिक लोकांच्या सहभागाबरोबरच त्यांच्याकडून स्थानिक जैवविविधतेची माहिती घे तिचे संकलन करणे रजेचे आहे. जैवविविधता ही शिवाजी विद्यापीठ परिसराची श्रीमंती आहे. या जैवविविधतेचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वच घटकांची आहे. संशोधक, प्राध्यापक यांच्याबरोबरच शाळेमधील विद्यार्थ्यांनाही जैवविविधतेच्या संवर्धनाची माहिती देण्याची आवश्यकता आहे. पीपल्स् बायोडायव्हर्सिटी रजिस्टर (पीबीआर) मध्ये कर्नाटक, गुजरात, केरळ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी झालेल्या आहेत. परंतु, महाराष्ट्रामध्ये याचे अत्यल्प म्हणजे अगदी दोन अंकी प्रमाण आहे.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ए.डी. जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. एम.व्ही. शांताकुमार यांनी आभार मानले. यावेळी डॉ. डी.व्ही. मुळे यांच्यासह पर्यावरणशास्त्राचे दोनशेहून अधिक संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.


दरम्यान, सायंकाळी श्री. बर्डेकर, कोल्हापूरचे उप-वनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ला (भा.व.से.) आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचा समारोप समारंभ झाला. यावेळी रेशीमशास्त्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या यळगूड (ता. हातकणंगले) येथील शेतकरी आप्पासो झुंजार, विश्वास खोत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या प्राणीशास्त्राच्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
 

No comments:

Post a Comment