कोल्हापूर,
दि.0५ ऑक्टोबर -
महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठामध्ये आज त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या
इतिहास अधिविभागामध्ये महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी विकास
विभागाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव,
इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.एन.डी.पारेकर,
डॉ.अवनीश पाटील,
डॉ.निलांबरी जगताप,
उमेश भोसले,
शरद पाटील,
धिरज शिंदे,
एम.एल.सोनटक्के यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----
-----
No comments:
Post a Comment