मुंबई येथे कव्वाली सादरीकरण करीत असताना शिवाजी विद्यापीठाचा संघ. |
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू व मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. सुजीत जाधव, सुरेश मोरे आणि प्रथम क्रमांक विजेता शिवाजी विद्यापीठाचा कव्वाली संघ. |
कोल्हापूर, दि. १३ ऑक्टोबर: मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय
कव्वाली स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने अत्यंत दर्जेदार सादरीकरणाच्या जोरावर
प्रथम क्रमांक पटकावला.
भारतीय विद्यापीठ महासंघाच्या वतीने मुंबई विद्यापीठात १० व ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय कव्वाली स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेत पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश व महाराष्ट्र या राज्यांतील एकूण दहा विद्यापीठांचे संघ सहभागी झाले. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक
मिळविला. आकर्षक चषक, प्रशस्तिपत्रक व रोख पंचवीस हजार रुपये असा
पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ संघाने सादर केलेल्या कव्वालीचे संगीत दिग्दर्शन सिद्धेश जाधव (मुंबई) व श्रीमती संपदा माने-कदम (मुंबई) यांनी केले. विजय जाधव व रवींद्र जाधव यांनी संगीत साथीदार म्हणून काम केले.
प्रिती मनवाडकर, प्रथम लाड, ऋषिकेश देशमाने, काजल नरूटे, केदार गुरव, संज्योती जगदाळे, निलंजय वड्डलवार, आदिती धनवाडे, जीवन पाटील, काजल धुर्वे या दहा जणांचा संघात समावेश होता. या संघाचा सराव व व्यवस्था यासाठी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, प्राचार्य डॉ. एस.आर. पाटील यांनी परिश्रम घेतले. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.सुजित जाधव, सुरेश मोरे यांनी काम
पाहिले. या यशाबद्दल कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे, प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन
केले.
No comments:
Post a Comment