कोल्हापूर दि.0४ ऑक्टोबर -अवयवदान जागृतीमध्ये तरुणांचे योगदान आवश्यक, असे प्रतिपादन डॉ.जयप्रकाश रामानंद यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.ए अधिविभागामध्ये आयोजित अवयवदान जागृती कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी छत्रापती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य व व्यवस्थापन
शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव उपस्थित होते.
डॉ.जयप्रकाश रामानंद पुढे म्हणाले, तरुणांमध्ये अवयवदानासंबंधी जागृती होणे गरजेचे आहे. सध्या भारतामध्ये अवयवांची गरज असणा-या लोकांची संख्या फार मोठी आहे आणि दान करणारे लोक कमी आहेत जर तरुणांचा सहभाग वाढला तर ते या संदर्भात चांगले समाज प्रबोधन करु शकतील.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मोहन राऊत यांनी विद्यार्थ्यांना अवयवदान म्हणजे नेमके काय? अवयवदान
व देहदान यातील फरक, अवयवदाना
संदर्भातली समज, गैरसमज
आणि अवयवदानाची संपुर्ण प्रक्रिया याची माहिती दिली या प्रसंगी त्यानी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
एम.बी.ए. अधिविभागाचे संचालक डॉ. एच.एम. ठकार यांनी प्रास्ताविक केले तर एम.बी.ए विभागाच्या विद्यार्थ्यांनी या प्रसंगी अवयवदान जागृती विषयक पथनाटय सादरीकरण केले.
या कार्यक्रमाच्या दुपारच्या सत्रामध्ये भित्तिचित्रा स्पर्धेचे आयोजन केले गेले. या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठामधील विविध अधिविभागामधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.

----
No comments:
Post a Comment