औरंगाबादच्या इंडो जर्मन टूल रूमसमवेत झालेल्या सामंजस्य करारास मूर्त
स्वरूप
कोल्हापूर. दिनांक ०५ नोव्हेम्बर, २०१७ - पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच अभियांत्रिकीतील अत्याधुनिक संशोधनाकरिता शिवाजी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्यात झालेल्या सामंजस्यकरारानुसार विद्यापीठात 'ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटर' - ए सेंटर फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड डेव्हलपमेंट’ची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठ या सेंटरच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण, समाजोपयोगी संशोधन व मनुष्यबळ विकास अश्या प्रशिक्षण - संशोधन - विकास या तीन घटकांवर भरीव काम करणार असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) देवानंद शिंदे यांनी सांगितले.
नॅक मार्फत 'A' मानांकित शिवाजी विद्यापीठाने गतवर्षी संशोधन
व गुणवत्तेच्या जोरावर 'एन. आय. आर. एफ.' मध्ये देशभरातून अठ्ठाविसावे स्थान पटकाविले
आहे. नुकतेच राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत ३२ विद्यापीठातील यादीत शिवाजी
विद्यापीठाचा समावेश झाला आहे. भरीव संशोधनाच्या पायावर शिवाजी विद्यापीठ
भारतातील एक अग्रगण्य विद्यापीठ बनले आहे. विद्यापीठ स्थानिक उदयॊगाच्या समस्या
सोडविण्याकरिता तसेच मनुष्यबळाची रोजगारक्षमता वाढविण्याकरिता प्रयत्न करीत आहे. ऍडव्हान्सड
टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठाने महत्वाचे पाऊल उचललेले
आहे. कोल्हापुरातील विविध औद्योगिक वसाहतींमधील उदयॊगांच्या आवश्यक गरजांना समजून घेऊन नीड बेस्ड
कोर्सेस या सेंटरच्या माध्यमातून दिले जातील. कौशल्य विकास ही
देशासाठी काळाजी गरज आहे. या सेंटरमध्ये विद्यापीठ
परिक्षेत्र तसेच परिक्षेत्राबाहेरील विविध अभियांत्रिकी व
इतर विद्याशाखांचे
विद्यार्थी,
प्राध्यापक, उद्योजक व संशोधक याना भारत सरकारच्या एम. एस. एम. ई. मंत्रालयाअंतर्गत इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादच्या सहाय्याने
अप्लाईड कोर्सेसच्या माध्यमातून कौशल्ये प्रदान केली जातील. भारत
सरकारच्या स्टार्ट अप प्रकल्पाअंतर्गत आय. जी. टी. आर. औरंगाबाद येथेही
प्रगत संशोधनाची सोय उपलब्ध करून दिली जाईल. याद्वारे भविष्यात विद्यापीठात डिपार्टमेंटऑफ टेक्नॉलॉजी येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमांची सुरुवात
करता येईल,
अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) देवानंद शिंदे यांनी दिली.
येथील कोर्सेस १० वी पास, १२ वी पास, आय.टी.आय, डिप्लोमा, डिग्री आदी विविध शैक्षणिक अर्हतांधारकांसाठी
असून या सर्व कोर्सेसची विस्तृत माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
उद्योगांना आवश्यकतेनुसार टेलरमेड कोर्सेसदेखील हे सेंटर देणार आहे. या सेंटरच्या
माध्यमातून नव संशॊधानाला तसेच विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन मिळणार
आहे. हॅन्ड्स ऑन ट्रेनिंग विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असल्याचे डिपार्टमेंट ऑफ
टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. (डॉ) जयदीप बागी यांनी सांगितले.
या पत्रकारपरिषदेस विद्यापीठाचे प्र. कुलगुरू
प्रा.(डॉ) .डी.टी.शिर्के, कुलसचिव
प्रा.(डॉ).व्ही.डी. नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्री.
एम. ए. काकडे, वित्त व लेखा अधिकारी श्री. ए. बी. चौगुले, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक प्रा. (डॉ) जयदीप बागी तसेच
ऍडव्हान्सड टेक्नॉलॉजी सेंटरचे समन्वयक श्री. हर्षवर्धन पंडित आदी उपस्थित
होते.
काय आहे इंडो जर्मन टूल रूम ?-
देशातील उद्योगांच्या, विशेषतः सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वाढ व विकासाला
चालना देण्याकरिता भारत सरकारने इंडो जर्मन टूल रूमची स्थापना केली. आय.जी.टी.आर
औरंगाबाद उद्योगांना जागतिक दर्जाचे उत्पादन व सेवा प्रदान करते. भारत सरकार, जर्मनीचे संघीय प्रजासत्ताक सरकार व
महाराष्ट्र सरकार यांचा एकत्रित प्रकल्प असलेले इंडो जर्मन टूल
रूम, औरंगाबाद आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता
साधने, प्रशिक्षित कर्मचारी तसेच कन्सल्टन्सी देते.
महाराष्ट्रात पुणे, नागपूर व मुंबई येथे आय.जी.टी.आरची तीन
उपकेंद्रे असून महाराष्ट्रातील चौथे उपकेंद्र कोल्हापूर येथे ऍडव्हान्सड
टेक्नॉलॉजी सेंटरच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठात सुरु झाले आहे.
--------
"शिवाजी
विद्यापीठाने ज्ञानदान व प्रगत संशोधनाबरोबरच स्थानिक उद्योगांच्या विकास व सक्षमीकरणाकरिता अत्यंत महत्वाचा पुढाकार घेतला आहे.
कोल्हापुरातील विविध औद्योगिक वसाहतीतील उद्योगाच्या तांत्रिक अडचणी समजून घेऊन
त्यावर उपाय योजनाकरिता प्रशिक्षित कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध करून पश्चिम
महाराष्ट्रातील उद्योगाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्याकरीता विद्यापीठ कटिबद्ध
आहे."
--- प्रा. (डॉ) देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ
कोर्सेसची
माहिती :
- विविध शॉर्ट टर्म, मेडीयम टर्म व लॉन्ग टर्म कोर्सेस
- विविध इंजिनियरिंग सॉफ्टवेर्सच्या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढणार
- स्किलबेस्ड कोर्सेसमुळे नोकरीच्या संधी वाढतील
- महिलांना व्होकेशनल स्किल्स देण्याची सोय
- कोल्हापूर व आजूबाजूच्या परिसरातील उद्योगांना टेक्निकल, टेस्टिंग व ऍनालिसिस आदींची कन्सल्टन्सी उपलब्ध होणार
- विविध व्होकेशनल कोर्सेस तसेच वर्किंग प्रोफेशनल्स आदींसाठी एक्सलुसीव्ह कोर्सेस
- टेक्निकल डोमेन्समधील लेटेस्ट डेव्हलपमेंट समजून घेता येणार
- अद्ययावत उपकरणांवर 'हॅन्ड्स ऑन ' ट्रेनिंग आय.जी.टी.आर प्रशिक्षक देणार
- संशोधन व प्रकल्पांवर संयुक्तपणे काम होणार
- विद्यार्थ्यांनी अद्ययावत तांत्रिक ज्ञान, कौशल्य व क्षमता मिळवाव्या याकरीता प्रयत्न
- अभियांत्रिकीच्या Mechanical Engineering, Production Engineering, Automobile Engineering, Civil Engineering, Electronics and Telecommunication Engineering, Computer Science and Technology आदी शाखांमध्ये विविध कार्यशाळा, चर्चासत्रे होणार
- कोर्सेस:अटोकॅड, सॉलिडवर्क्स, कटिया, युनिग्राफिक्स, डेलकॅम, मास्टरकॅम, अँसिस, रेव्हीट आर्किटेक्चर, पी. एल. सी. प्रोग्रामिंग, स्काडा, व्ही. एल. एस. आय. , टूल डिझाईन आदी शॉर्ट टर्म (७२-९६ तास), मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन टूल डिझाईन, मास्टर सर्टिफिकेट कोर्स इन कॅड/कॅम असे मेडीयम टर्म तसेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड/कॅम, पोस्ट डिप्लोमा इन टूल डिझाईन अँड कॅड/ कॅम असे लॉन्ग टर्म कोर्सेस
No comments:
Post a Comment