Monday, 11 December 2017

अमेरिकन व भारतीय संविधानाची

अमेरिकन विधिज्ञाकडून होणार तुलनात्मक मांडणी




विद्यापीठात १४ डिसेंबरपासून ग्यान उपक्रमांतर्गत व्याख्याने

Prof. Dr. Marc David Brown
कोल्हापूर, दि. ११ डिसेंबर: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ग्यान उपक्रमांतर्गत अमेरिकेतील ज्येष्ठ विधिज्ञ प्रा. डॉ. मार्क डेव्हीड ब्राऊन यांची येत्या १४ ते २० डिसेंबर २०१७ या कालावधीत शिवाजी विद्यापीठात विशेष व्याख्याने होणार आहेत. अमेरिका व भारतीय संविधानाचे तुलनात्मक विश्लेषण प्रा. ब्राऊन आपल्या व्याख्यानांद्वारे करतील.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय पुरस्कृत ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अॅकॅडेमिक नेटवर्क (ग्यान) या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या विधि अधिविभागातर्फे दि. १४ डिसेंबरपासून अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्रा.डॉ. मार्क डेव्हीड ब्राऊन यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. अन्डरस्टँडिंग द अलॉकेशन ऑफ पॉवर अन्डर द युनायटेड स्टेट्स अॅन्ड इंडियन कॉन्स्टिट्यूशन: अ कम्पॅरॅटिव्ह अॅनालिसिस या विषयावर ते व्याख्याने देतील.
कोल्हापूर न्यायालयाचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. एम.ए. लव्हेकर यांच्या हस्ते येत्या गुरूवारी (दि. १४) सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयाच्या व्हर्चुअल क्लासरुममध्ये या व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती विद्यापीठाच्या ग्यान उपक्रमाचे समन्वयक डॉ. आर.के. कामत आणि अभ्यासक्रम समन्वयक डॉ. व्ही.वाय. धुपदाळे यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment