शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. |
शिवाजी विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅक परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करताना प्र- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. |
शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची सफाई करताना कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर. |
शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराची सफाई करताना वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील. |
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसमवेत स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य अधिकारी. |
शिवाजी विद्यापीठात स्वच्छता अभियानात सहभागी झालेले अधिकारी व कर्मचारी. |
शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले विद्यार्थी. |
शिवाजी विद्यापीठाच्या स्वच्छता अभियानात सहभागी झालेले विद्यार्थी. |
कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात
दरवर्षीप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यापीठ परिसर
स्वच्छता अभियान अत्यंत उत्साहात राबविण्यात आले. अभियानाला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचा
मोठा प्रतिसाद लाभला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के,
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व
लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन
पळसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले.
रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा अशा प्रकारचा कचरा आज मोठ्या प्रमाणात साफ करण्यात
आला.
गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता
अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीकमुक्ती करण्यात आलेली असल्यामुळे तसेच
परिसरात वावरणाऱ्या व्यक्तींच्या सजगतेमुळे विद्यापीठाचा परिसर हा बहुतांश
प्लास्टीकमुक्त बनला आहे. तथापि, अलिकडेच सिंथेटिक ट्रॅकवर झालेल्या काही क्रीडा
स्पर्धांमुळे त्या मैदानाच्या परिसरात चॉकलेट-बिस्कीटांचे रॅपर मोठ्या प्रमाणात
पडले होते. ही बाब लक्षात येऊन कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के,
कुलसचिव डॉ. नांदवडेकर या तिघांनी त्या परिसरातील प्लास्टीक कचरा गोळा करण्यास
प्राधान्य दिले आणि अर्ध्या तासात तेथील प्लास्टीक कचरा गोळा केला. यंदा पाऊस अधिक
झाल्यामुळे परिसरात गवत, खुरट्या वनस्पती आणि झुडपे मोठ्या प्रमाणात
वाढली. रस्त्याकडेला असणाऱ्या अशा बहुतांश झुडपांची आजच्या मोहिमेत सफाई करण्यात
आली.
कोणत्याही औपचारिकतेशिवाय कुलगुरू
डॉ. शिंदे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी हातात खराटे, खुरपी घेऊन स्वच्छतेला सुरवात केली. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय
सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये तर
अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली.
कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी अन्य अधिकाऱ्यांसह पर्यावरणपूरक मोटारीतून
विद्यापीठ परिसरातील प्रत्येक अधिविभागाला भेट देऊन त्या त्या ठिकाणी चाललेल्या
स्वच्छता मोहिमेची पाहणी केली आणि शिक्षक व विद्यार्थ्यांना परिसर स्वच्छतेबरोबरच
प्लास्टीकमुक्तीचे आवाहन केले.
महात्मा
गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली
अभियानानंतर मुख्य प्रशासकीय
इमारतीमध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर
शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली
वाहण्यात आली. त्यानंतर गांधी अभ्यास केंद्राच्या संचालक तथा अधिष्ठाता डॉ. भारती
पाटील यांनी उपस्थितांना अहिंसा, शांततेची तसेच
स्वच्छतेची शपथ दिली.
या प्रसंगी कोल्हापूर
महानगरपालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह
अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ.
आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह विविध
अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
फिट इंडिया दौड उत्साहात
आज सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंके व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के
यांच्या हस्ते फिट इंडिया प्लॉगिंग दौडीचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या दौडीत बहुसंख्येने सहभाग दर्शविला आणि रॅली उत्साही
प्रतिसादात यशस्वी झाली. विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीने या दौडीचे
नियोजन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठात आयोजित फिट इंडिया प्लॉगिंग दौडीत कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासमवेत सहभागी झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी. |
No comments:
Post a Comment