Friday, 26 February 2021

माध्यमांचा चिकित्सक वापर व्हावा: डॉ. सुनिलकुमार लवटे

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ या ग्रंथ प्रकाशन समारंभात बोलताना डॉ. सुनिलकुमार लवटे. (डावीकडून) भाग्यश्री कासोटे, सम्राट फडणीस, विनायक औंधकर, सचिन वायकुळे आणि डॉ. शिवाजी जाधव.
 

शिवाजी विद्यापीठात सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना डॉ. सुनिलकुमार लवटे. (डावीकडून) भाग्यश्री कासोटे, सम्राट फडणीस, विनायक औंधकर, सचिन वायकुळे आणि डॉ. शिवाजी जाधव.


सचिन वायकुळे यांच्या ‘पत्रकारिता शोध आणि बोध’चे प्रकाशन

कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी: माध्यमांचा विस्तार झपाट्याने होत असला तरी प्रत्येकाने माध्यमांचा वापर चिकित्सक पद्धतीने केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनिलकुमार लवटे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाच्या वतीने पत्रकार सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते काल बोलत होते. यावेळी दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस, महापालिका उपायुक्‍त विनायक औंधकर, पद्मश्री कै. डॉ. ग. गो. जाधव अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, प्रकाशक भाग्यश्री कासोटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सम्राट फडणीस यांनी यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विश्‍वासार्हता टिकवणे पत्रकारितेत सर्वात मोठे आव्हान आहे. फेक न्यूज आणि दिशाभूल करणार्‍या माहितीमुळे पत्रकारितेभोवती संशयाचे वलय निर्माण झाले आहे. यासाठी या क्षेत्रात काम करणार्‍या घटकांनी एकत्र येऊन सत्यस्थिती समोर आणणे आवश्यक आहे. 
सचिन वायकुळे, विनायक औंधकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला सांगली महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. श्रीहरी देशपांडे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. सुमेधा साळुंखे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment