Wednesday, 17 February 2021

वित्तीय तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब आवश्यक: डॉ. शरिक निसार

 

डॉ. शरिक निसार

कोल्हापूर, दि. १७ फेब्रुवारी: वित्तीय तंत्रज्ञान (फिनटेक) पुरवणाऱ्या कंपन्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. निश्चलनीकरण गेल्या वर्षभरातील कोरोना संसर्ग यांमुळे संगणकीकृत ऑनलाईन व्यवहारात वाढ होत आहे. याच अनुषंगाने बँकिंग अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही होत असून त्यासाठी वित्तीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे सर्वसामान्यांच्या दृष्टीने तसेच कंपन्यासाठीही आवश्यक आहे, से मत मुंबईच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज  इन्स्टिटयूटचे संशोधन सल्लागार प्रा. डॉ. शरिक निसार यांनी आज व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. आर. एन. गोडबोले अध्यासनामार्फत भारतातील वित्तीय तंत्रज्ञानाची स्वीकृती: व्याप्ती आव्हाने या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

डॉ. निसार यांनी वित्तीय समावेशन प्रक्रियेतील तंत्रज्ञानाचे महत्त्व वि केले. ते म्हणाले, वित्तीय क्षेत्र मोठ्या प्रमाणात ग्राहक असलेले क्षेत्र आहे. तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण ग्राहकांना वित्तीय सेवा देण्यास उपयुक्त ठरले आहे. तथापि, नियंत्रण, वैश्विक वित्तीय संस्था, नियमाधारित कि तत्त्वाधारित नियंत्रण, एकल कि बहुनियंत्रण इत्यादी आव्हाने फिनटेक कंपन्यासमोर आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून आधार क्रमांकाशी सर्व सुविधा जोडल्यामुळे सर्वच व्यवहारांमध्ये सुसूत्रता आली आहे. भविष्यात बँकिंग, वित्तीय बाजार विमा या क्षेत्रासाठी एकच नियंत्रक असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. फिनटेक संदर्भातील नव्या पिढीची गरज ओळखून आवश्यक ते बदल घडविले पाहिजेत, उच्चंशिक्षण संस्थांनी फिनटेकबाबतचा वाढता कल विचारात घेऊन त्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा.

अध्यासनप्रमुख अधिष्ठाता प्रा.डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय करून दिला. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर, डॉ. . एम. गुरव तसेच विद्यापीठ महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले.. संशोधन सहाय्यक तेजपाल मोहरेकर प्रियंका कुंभार यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment