Friday, 12 March 2021

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण यांची जयंती

 


कोल्हापूर, दि. १२ मार्च: महाराष्ट्राचे भाग्यविधाते व पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. प्रकाश पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह यशवंतराव चव्हाण स्कूलचे अध्यापक, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment