इफ्फीच्या ७५ क्रिएटिव्ह माईंड्समध्ये निवड झाल्याबद्दल सोमदत्त देसाई याचा सत्कार करताना डॉ. अनमोल कोठाडिया. सोबत अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव. |
कोल्हापूर, दि. ४ डिसेंबर: भारतात १९५२ साली भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापासून (इफ्फी) नववास्तववादी चित्रपटांची परंपरा आहे. ही परंपरा पुढे घेऊन
जाण्यास गोव्यातील ‘इफ्फी’ची मदत होत आहे,
असे प्रतिपादन जेष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. अनमोल
कोठाडिया यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनच्या
वतीने आयोजित ‘इफ्फी आणि चित्रपट चळवळ’ या विषयावर ते
बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते. यावेळी
इफ्फीच्या ७५ क्रिएटिव्ह माईंड्समध्ये निवड झालेला एम.ए. मास
कम्युनिकेशनचा विद्यार्थी सोमदत्त देसाई याचा डॉ. कोठाडिया याच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
डॉ. कोठाडिया म्हणाले,
भारतीय चित्रपट चळवळीला
मोठी परंपरा आहे. इफ्फीमुळे ही परंपरा पुढे जात आहे. १९५२मध्ये त्यावेळच्या
महोत्सवात दाखवलेल्या ‘बायसिकल थिव्ज’ या चित्रपटाने
एक नवा वास्तववादी दृष्टीकोन दिला. त्यानंतरच्या काळात नाववास्तववादी चित्रपटांची
मांडणी होऊ लागली. सध्याच्या इफ्फीला समजून घेताना हा इतिहास समजून घ्यावा लागेल.
तत्पूर्वी १९२५ पासून लंडनमध्ये सुरू झालेल्या चित्रपट चळवळी पासून व्हेनिस चित्रपट
महोत्सवापर्यंत अनेक गोष्टींचे नीट आकलन करून घ्यावे लागेल. चित्रपटाचा
समाजावर खूप मोठा आणि तत्काळ परिणाम होत असल्याने हे माध्यम प्रचारासाठी वापरले
जाते. हा केवळ सांस्कृतिक उपक्रम नाही, तर त्याला अनेक बाजू
आहेत.
गोव्यातील महोत्सवाने जगाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. जगातील चित्रपट,
विषय, मांडणी आणि वेगवेगळे प्रयोग अनुभवाने शक्य झाले. भारतीय चित्रपटातील वेगळेपणही
या निमित्ताने अधोरेखित होत आहे, असे ते म्हणाले. सोमदत्त देसाई यानेही यावेळी
विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
इफ्फीच्या क्रिएटिव्ह माईंडमध्ये निवड झाल्याबद्दल सोमदत्त देसाई याचा सत्कार करताना डॉ. अनमोल कोठाडिया. सोबत अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव.
No comments:
Post a Comment