कोल्हापूर, दि. ३०
डिसेंबर: शिवाजी विद्यापीठाचे
प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त आज
विद्यापीठात त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत आज सकाळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व
प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते डॉ. पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर
विद्यापीठ प्रांगणातील अतिथीगृहासमोरील डॉ. पवार यांचा अर्धपुतळा आणि डॉ.
आप्पासाहेब पवार कमवा आणि शिका विद्यार्थी वसतीगृह येथील अर्धपुतळा यांनाही
पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी कुलसचिव डॉ.
व्ही.एन. शिंदे यांच्यासह प्रा. किसनराव कुराडे, डॉ. टी.के. सरगर, प्राचार्य डॉ.
जी.पी. माळी, डॉ. एस.जे. नाईक, डॉ. मानसिंगराव जगताप, डॉ. सी.टी. पवार, डॉ. सी.एच.
भोसले, डॉ. एन.एल. तरवाळ आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment