विविध ३५ गटांत पटकावली एकूण ५८ पारितोषिके
कोल्हापूर, दि. २५ डिसेंबर: येथील
गार्डन क्लब आणि राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या पुष्प प्रदर्शन व स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाने विविध
३५ गटांत एकूण ५८ पारितोषिके प्राप्त करीत यंदाही सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.
विद्यापीठाने विविध पुष्प स्पर्धांमध्ये एकूण १३ प्रथम क्रमांक, २६ द्वितिय
आणि १९ तृतीय अशी एकूण ५८ पारितोषिके प्राप्त केली. गेले दोन दिवस कृषी
महाविद्यालयात झालेल्या या प्रदर्शन व स्पर्धेचा आज सायंकाळी पारितोषिक वितरण
समारंभ झाला.
यावेळी समारंभाचे अध्यक्ष अरुण नरके यांच्या हस्ते विद्यापीठाचे
प्रभारी कुलसचिव तथा उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, उद्यान विभागाचे
अधीक्षक अभिजीत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वसाधारण विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान
करण्यात आली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे,
गार्डन क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी
कुलकर्णी, कोषाध्यक्ष राज अथणे उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या उद्यान विभागामार्फत या स्पर्धेसाठीची आवश्यक
ती तयारी करण्यात आली. विद्यापीठास मिळालेल्या पारितोषिकांचा तपशील पुढीलप्रमाणे:
गुलाब प्रदर्शन व स्पर्धा: पांढरा
(द्वितीय व तृतीय), नारंगी (द्वितीय), गडद गुलाबी (द्वितीय व तृतीय), किरमिजी (तृतीय),
फिका पिवळा (द्वितीय व तृतीय), पट्टेदार (प्रथम व तृतीय), गडद पिवळा (द्वितीय व
तृतीय), निळा (प्रथम व द्वितीय), दुरंगी (द्वितीय व तृतीय).
एकूण सहा फुले (प्रथम व तृतीय), एकूण नऊ फुले (तृतीय), एकूण बारा फुले
(द्वितीय व तृतीय), सहा जातीची सहा फुले (प्रथम, द्वितीय), नऊ जातीची बारा फुले (प्रथम,
द्वितीय), बटण गुलाब (द्वितीय व तृतीय), फ्लोरीबंडा (द्वितीय), बिगोनिया (तृतीय),
एस्टर (प्रथम व द्वितीय), डेलिया (प्रथम, द्वितीय), मिनी डेलिया (प्रथम, द्वितीय),
ग्लॅडिओलस (द्वितीय), झेंडू (तृतीय), जिरेनियम (द्वितीय व तृतीय), झिनिया (द्वितीय
व तृतीय), शेवंती (द्वितीय व तृतीय), जरबेरा (प्रथम व द्वितीय), इतर फुले (द्वितीय),
निशीगंध (द्वितीय), डेझी (द्वितीय व तृतीय), जास्वंद (द्वितीय व तृतीय), औषधी व
सुगंधी वनस्पती (प्रथम), गुलाब- कुंड्यातील रोपे (प्रथम व द्वितीय), कुंड्यांतील
रोपे- क्रोटॉन (प्रथम, द्वितीय), कुंड्यांतील रोपे- कोलीयस (तृतीय) आणि
कुंड्यांतील रोपे- फर्न (प्रथम).
No comments:
Post a Comment