Wednesday, 30 November 2022

नॉनस्टीक वस्तूंच्या अतिवापराचे यकृतावर दुष्परिणाम: संशोधक डॉ. उदयन आपटे

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना संशोधक डॉ. उदयन आपटे.


 

कोल्हापूर, दि. ३० नोव्हेंबर: दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या नॉनस्टीक वस्तुंमुळे यकृताचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा अतिवापर टाळावा, असा सल्ला अमेरिकेतील कान्सास विद्यापीठातील फार्मेकॉलॉजी-टॉक्झिकॉलॉजी विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उदयन आपटे यांनी आज येथे दिला. शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र अधिविभागाडेसिफरिंग मॅकेनिझम्स ऑफ लीव्हर टॉक्झिसिटी इन्ड्युस्ड बाय पॉलीफ्लुरोअल्काईल सबस्टन्सेस (पी.एफ.ए.एस.) युजिंग ग्लोबल जीन एक्स्प्रेशन एनालिसीस या विषयावरील विशेष व्याख्यानामध्ये ते बोलत होते.

नॉनस्टिक भांडी, रेनकोट, वॉटरप्रुफ मेक उत्पादने आणि स्टेनप्र कपडयांच्या तिवापरामुळे यकृताचे आजार हो शकतात, असे सांगून डॉ. आपटे म्हणाले, पी.एफ.ए.एस. रसायनांच्या तिवापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती, प्रजननक्षमता, गर्भवाढ आणि यकृतावर दुष्परिणाम होतात. तसेच कर्करोगासारखे घातक आजारही उद्भवू शकतात. अथक सात र्षांच्या संशोधनानंतर माझ्या असे लक्षात आले की, पी.एफ.ए.एस.चा अर्धायुकाल (हाफ लाईफ पिरियड) तीन वर्षाचा असून त्याचे विघटन लवकर होत नाही. त्याचा यकृताशी संबंध आल्यास यकृताला सूज येणे, यकृता चरबी साठणे तसेच हायपर कोलेस्ट्रोलेमियाचा धोका उद्भवतो. या संशोधनामध्ये अमेरिकी लोकांच्या रक्तामध्ये पी.एफ.ए.एस.चे अंशही आढळून आले आहेत. त्याचा वापर कमी करण्यासाठी जेन-एक्स या पर्यायी रसायनाचा शोध लावला गेला. त्याचा अर्धायुकाल काही दिवसांचा आहे. तथापि, त्याचा अतिरिक्त वापर देखील धोकादायक ठरू शकतो. दोन्हीही रसायनांची विघटन प्रक्रिया शोधणे आव्हानात्मक आहे. भारतामध्ये याचा वापर अतिरिक्त असूनही त्यावर अजून संशोधन झालेले नाही. भारतामध्ये या संदर्भातील अधिक संशोधनात्मक माहिती मिळविणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तावि डॉ. माधुरी वाळवेकर यांनी केले. अधिविभागप्रमुख डॉ. आशिष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. एन. ए. कांबळे यांनी आभार मानले. या वेळी डी.वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. मेघनाद जोशी, वेंगुर्ला येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे डॉ. वसंत पाटोळे, डॉ. नितिन पोटफोडे, सुभाष मुंजे, डॉ. एस. एम. गायकवाड, डॉ. एस. आर. यंकंची, डॉ. एम. पी. भिलावे, संशोधक एम.एस्सी.चे विदयार्थी उपस्थित होते.

Tuesday, 29 November 2022

ढासळत्या नैतिकतेचे देशासमोर आव्हान: प्राचार्य राजेंद्र कुंभार

 

शिवाजी विद्यापीठात प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत बोलताना डॉ. राजेंद्र कुंभार. मंचावर (डावीकडून) डॉ. जगन कराडे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सुचिता कोरगावकर.

कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: ‘ढासळती सामाजिक व राजकीय नैतिकता हे आजच्या अमृतमहोत्सवी भारतासमोरील प्रमुख आव्हान आहे. शिक्षण, महागाई, धर्मवाद आणि जातीवाद इत्यादी समस्यांची सोडवणूक होण्यासाठी शैक्षणिक सुधारणा घडून येणे आवश्यक आहे. त्यासाठी  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वप्नांची नजर दिली पाहिजे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर सुचिता कोरगावकर प्रमुख उपस्थित होत्या.

डॉ. कुंभार म्हणाले, शिक्षण व्यवस्थेसमोर आज अनेक समस्या आहेत. ज्ञान आणि मती यातील भेद ओळखून त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. आजचे शिक्षक विद्यार्थ्यांना स्वप्नांची नजर देण्यात कमी पडत आहेत. शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे. जागातील सर्व प्रश्न प्रेमाने सुटतात आणि बौद्ध विचार त्यासाठी मार्गदर्शक आहेत. तृष्णा आणि गरज यातील भेद आपणास ओळखता आला पाहिजे.

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी संयम आणि सातत्य यांच्या आधारे आपल्यातील क्षमता वृद्धिंगत केल्या पाहिजेत. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी कष्ट केले पाहिजे.

या व्याख्यानमालेचे आयोजन प्रभाकरपंत कोरगावकर ट्रस्ट यांनी विद्यापीठास दिलेल्या देणगीतून केले जाते. ट्रस्टच्या संचालक सुचिता कोरगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख करून दिली. डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. अभिजित पाटील शरद पाटील, श्रीरंग बेलेवडे, श्रीधर साळोखे  आदींनी संयोजन केले.

नॅनोतंत्रज्ञानाधारित सेरोटोनिन सेन्सिंग पद्धतीला भारतीय पेटंट

 शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्रज्ञांचे संशोधन

डॉ. साजिद मुल्लाणी

डॉ. सागर डेळेकर
 










(डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. साजिद मुल्लाणी यांचे व्हिडिओ बाईट)

कोल्हापूर, दि. २० नोव्हेंबर: येथील शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी मानवी शरीरातील 'आनंददायी मूलद्रव्य असलेल्या सेरोटोनिन या मूलद्रव्यासाठी नॅनो-संयुगांच्या सहाय्याने सेन्सिंग पद्धत विकसित केली असून त्यासाठी त्यांना नुकतेच भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. सागर दा. डेळेकर आणि संशोधक विद्यार्थी डॉ. साजिद बा. मुल्लाणी यांनी ही कामगिरी केली आहे. डॉ. डेळेकर यांचे या वर्षातील हे सलग दुसरे भारतीय पेटंट आहे. रसायनशास्त्राच्या क्षेत्रामधील हे एक महत्त्वपूर्ण संशोधन असून मानवाच्या विविध मनोविकारांचे निदान आणि उपचारांमध्ये दूरगामी परिणाम करण्याची क्षमता त्यात आहे.

डॉ. डेळेकरडॉ. मुल्लाणी यांनी विकसित केलेली ही सेन्सिंग पद्धती अत्यंत सोपी व सुलभ स्वरुपाची आहे. ही पद्धत विकसित करण्याकरिता अल्पखर्चिक नॅनोसंमिश्रांवर आधारित इलेक्ट्रोडचा वापर करण्यात आला आहे. सदरचे संशोधन २०२० साली रसायनशास्त्रातील अत्यंत प्रतिष्ठित अशा "सायंटिफि रिपोर्ट" या नेचर संशोधन पत्रिकेमध्येही प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनासाठी स्कॉटलंडमधील (ग्रेट ब्रिटन) संशोधन सहयोगी डॉ. लिन डेन्नी, अमेरिकेतील संशोधक डॉ अन्नदानेश शेल्लेकरी, दक्षिण कोरियातील संशोधक डॉ. नवाज मुल्लाणी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

या संशोधनासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. सागर डेळेकर म्हणाले, सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये माणसाचे त्याच्या शारीरिक मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते आहे. त्यामधून अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मानवी शरीरातील 'आनंददायी मूलद्रव्य मानल्या जाणाऱ्या सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे माणसाला मानसिक ताण-तणाव, नैराश्य, चिंता, निद्रेच्या समस्या, पचनाच्या समस्या, आत्मघाती वर्तन, वेड लागणे, आघातानंतरची तणावपूर्ण विकृती, स्किझोफ्रेनिया (मानसिक विकार), फोबिया (भीती) यासारख्या विविध मनोकायिक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील सेरोटोनिन या मूलद्रव्याच्या एकूण प्रमाणावरच माणसाचे मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. परंतु सेरोटोनिनच्या असंतुलनामुळे मानवाच्या बिघडलेल्या मानसिक संतुलनाचे जर प्राथमिक अवस्थेत योग्य निदान झाल्यास त्याची मानसिक परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. या निदानासाठी आजघडीला अत्यंत महागड्या वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. यांना पर्याय म्हणून या संशोधनांतर्गत विविध नॅनोसंमिश्रांचा वापर करून अत्यंत सुलभ कमी र्चि सेरोटोनिन चाचणी पद्धती विकसित करण्यात यश आले आहे. या संशोधनामुळे विविध मानसिक विकारांचे अधिक चांगले आणि प्रभावी निदान करता येईल, त्याचप्रमाणे योग्य उपचार करण्यासही मदत होईल.

सदरच्या भारतीय पेटंटबद्दल डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. साजिद मुल्लाणी यांचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सहकारी शिक्षक, संशोधक विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

सातत्यपूर्ण संशोधनाचे फलित: कुलगुरू डॉ. शिर्के

डॉ. सागर डेळेकर आणि डॉ. साजिद मुल्लाणी हे सदर संशोधन प्रकल्पावर सन २०१८पासून काम करीत आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित म्हणजे हे पेटंट आहे. महत्त्वाचे म्हणजे आजघडीला लोक अनेक मनोकायिक आजारांना बळी पडत आहेत. या संशोधनामुळे अशा रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यात वैद्यकीय उपचारांमध्येही या पद्धतीचे समावेशन शक्य आहे. या संशोधकांचे अभिनंदन करीत असतानाच या क्षेत्रातील पुढील संशोधनही त्यांनी सुरू ठेवावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निमित्ताने केले.