Monday 14 November 2022

पंडित नेहरू यांना जयंतीनिमित्त

शिवाजी विद्यापीठात अभिवादन

  


कोल्हापूर, दि. १४ नोव्हेंबर: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment