|
अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी शिवाजी विद्यापीठास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी (डावीकडून) अमेरिकन कॉन्सुलेटचे रॅन मुलेन, डॉ. शिवाजी सादळे, डॉ. सागर डेळेकर, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील व डॉ. तृप्ती करेकट्टी. |
|
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुंबईतील अमेरिकन कॉन्सुल जनरल माईक हँकी. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. महादेव देशमुख व डॉ. सरिता ठकार. |
|
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद सुमारे तासभर साधल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्याचा मोह अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांना आवरला नाही. त्यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी. |
कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट: अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक
उच्चशिक्षणाच्या मुबलक संधी उपलब्ध असून त्यांचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर
परिसरातील विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल
माईक हँकी यांनी आज येथे केले.
कोल्हापूरच्या दोन
दिवसीय दौऱ्यावर आलेल्या हँकी यांनी आज राजर्षी शाहू सभागृहात शिवाजी
विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास
शिंदे उपस्थित होते.
कॉन्सुल जनरल माईक हँकी
म्हणाले, अमेरिकी विद्यापीठे व शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि संगणकशास्त्र
या शाखांपलिकडे मानव्यशास्त्रे, विज्ञान आणि व्यवस्थापन इत्यादी विद्याशाखांतीलही
आधुनिक उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांनी घ्यायला
हवा. अमेरिकेचे भारताशी घट्ट राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बंध आहेत. अमेरिकेत
उच्चशिक्षण घेण्यास पसंती दर्शविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चीनपाठोपाठ
सर्वाधिक आहे. अमेरिकेकडे शैक्षणिक व्हिसा मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
सातत्याने वाढती आहे. अमेरिकी विद्यापीठांसाठी भारतीय विद्यार्थी हे मोठी देणगीच
आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उभय देशांनाही भविष्यात मोठा लाभ
झाल्याखेरीज राहात नाही. शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी
अमेरिकेतील शिक्षण संधींचा लाभ घेण्याबाबत विचार करावा. त्यांना विद्यापीठ
निवडीपासून ते प्रवेश प्रक्रिया, व्हिसा प्रक्रिया आदींसाठी कॉन्सुलेट सर्वोतोपरी
सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तत्पूर्वी, व्यवस्थापन
परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शाल, श्रीफळ व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह
देऊन कॉन्सुल जनरल हँकी यांचा सत्कार केला. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी स्वागत
केले, तर इनोव्हेशन, इनक्युबेशन व
लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल अवगत केले. त्याबद्दल समाधान व्यक्त
करून शिवाजी विद्यापीठासमवेत नजीकच्या काळात साहचर्यवृद्धीबद्दलही सकारात्मक असल्याचे
त्यांनी सांगितले.
यावेळी कॉन्सुलेटचे
राजकीय व आर्थिक अधिकारी रॅन मुलेन, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व
लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.
सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.
श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बौद्धिक संपदा हक्क
कक्ष आणि आंतरराष्ट्रीय संबंध कक्ष यांचे समन्वयक डॉ. शिवाजी सादळे, इंग्रजी अधिविभागाच्या डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित
होते.
--
US Consul General interacts with SUK
students
Kolhapur: US is the most favorite
educational destination of Indian students. US Universities have more potential
to accommodate students who wish to seek higher education in faculties like humanities,
science and management beyond engineering and computer science. The students
from Shivaji University’s jurisdiction and Kolhapur region should come forward
to take these opportunities to learn in US universities, appeals Mr. Mike
Hankey, the US Consul General in Mumbai, while interacting with the students of
Shivaji University today.
The Consul General, who is on two
days visit of Kolhapur, visited Shivaji University today. Prof. D.T. Shirke,
the Vice Chancellor, Prof. P.S. Patil, the Pro-Vice Chancellor along with the
officers of University welcomed him at the University by presenting a memento of the University. Dr. Sagar Delekar, Director,
Centre of Innovation, Incubation and Linkages gave him a brief presentation
about the progress and achievements of Shivaji University. The Consul General
was much impressed with it and expressed his wish for extending the bilateral
ties with the University in near future.
Later on, Mr. Hankey interacted
with the UG, PG and research students of the University. He said, US has political,
socio-economic and socio-cultural ties with India since long. It is the most
favorite educational destination of Indian students, making them the second largest
group of foreign students in US after China. US student visa applications are
always up across India. Indian students are a great asset to United States
universities and colleges. Both
countries benefit greatly when our students study and learn together. He
encouraged students to think of US for their further higher education and assured
to extend his support through Consulate to ease their procedures like selection
of academic institutes, admission process, scholarships and visa etc.
Dr. V.N. Shinde, the Registrar,
Dr. Ajitsinh Jadhav, the Director, Board of Examinations and Evaluations, Dr.
Suhasini Patil, the Finance and Accounts Officer, Dr. S.S. Mahajan, Dean, faculty
of Commerce and Management, Dr. M.S. Deshmukh, Dean, faculty of Humanities, Dr.
S.H. Thakar, Dean, Science and Technology, Dr. S.B. Sadale, Director, Intellectual
Property Rights Cell and Coordinator, International Student
Cell, Dr. Trupti Karekatti of Department of English were
present at the program.