कोल्हापूर, दि. ९ ऑगस्ट: ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज शिवाजी
विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांना मनोभावे
अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या क्रांतीवन
उद्यानात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या
हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा
योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी कुसुमाग्रजांच्या ‘अनाम वीरा...’ या कवितेचे वाचन करून
हुतात्म्यांच्या स्मृती जागविल्या. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व
मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील,
वाणिज्य व व्यवस्थापन अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विद्यार्थी विकास विभाग
संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांच्यासह शिक्षक,
प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment