कोल्हापूर, दि.05 सप्टेंबर - भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती शिवाजी विद्यापीठात आज उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांच्या हस्ते भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ.रामचंद्र पवार, सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.पी.एम.गुरव, डॉ.एन.एच.नदाफ, पदार्थविज्ञान विभागप्रमुख डॉ.राजेंद्र सोनकवडे, डॉ.के.वाय.राजपुरे, डॉ.आर.एस.व्हटकर, डॉ.एन.व्ही.मोहळकर, एन.एम.नाईक, एच.बी.कांबळे यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.
-----
No comments:
Post a Comment