Monday, 25 May 2026

डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड - कुलगुरू डॉ.राजनीश कामत

 

कोल्हापूर, दि.25 मे - शिवाजी विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू डॉ.के.आर.यादव यांच्या निधनामुळे बहुआयामी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी व्यक्त केले.


      विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये प्रथम प्र-कुलगुरू डॉ.के.आर.यादव यांच्या दु:खद निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

          कुलगुरू डॉ. राजनीश कामत म्हणाले, डॉ.के.आर.यादव यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले. कडक शिस्तीचे, उत्कृष्ट अध्यापक, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून डॉ.यादव यांचे नांवलौकिक होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. नॅशनल सायन्स कौंग्रेसशी निगडीत असताना त्यांनी अग्रेसर पध्दीने कामे केली. शिवाजी विद्यापीठ आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर त्यांनी सदस्य आणि अध्यक्ष म्हणून काम पाहिले. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर यांनी लावलेली शिस्त ते पुढे घेवून गेले.

प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव शोकभावना व्यक्त करताना म्हणाल्या, विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू डॉ.के.आर.यादव यांनी न्यू-कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत असताना लावलेल्या कडक शिस्तीमुळे कॉलेजचे नांव पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार आदराने घेतले जात होते. त्यांच्या शिस्तीतच आम्ही सर्व विद्यार्थी घडलो.

       याप्रसंगी समाजशास्त्र अधिविभागाचे डॉ.प्रल्हाद माने, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे शरद तळेकर, शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघाचे नंदकुमार झांजगे यांनी शोकभावना व्यक्त केले.

            शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

-----

 

No comments:

Post a Comment