कोल्हापूर, दि. ३० मे : लोककल्याणकारी राज्यकारभार, सामाजिक
न्याय आणि लोकहितवादी प्रशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शिवाजी विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या
३०१ व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या
हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. मच्छिंद्र गोफणे, अविनाश भाले, डॉ. किशोर खिलारे, सुरेश बंडगर, डॉ. संतोष कोळेकर, डॉ. चांगदेव बंडगर, जयकुमार भोसले, शरद पाटील, दत्तात्रय घुटूकडे, यश आंबोळे, डॉ. प्रियांका जाधवर, शिवाजी शेळके यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)
No comments:
Post a Comment