सकाळचे फिरणे हा तरुणांसाठी कदाचित शारीरिक आरोग्याचा विषय असेल; पण ज्येष्ठ नागरिकांसाठी ते शारीरिक आरोग्याबरोबरच भावनिक स्वास्थ्याचाही भाग असते.
सकाळची कोवळी उन्हे, कधी
गुलाबी तर कधी बोचरी थंडी अंगावर घेत मित्रमंडळींसोबत फिरणे, फिरता
फिरता जुन्या आठवणींमध्ये रमणे आणि फिरून झाल्यावर आपला नेहमीचा कट्टा गाठणे...
तिथे थोड्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी आणि हास्यविनोदात रमून
दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत पुरेल इतका उत्साह आणि मैत्रीचा ताजा श्वास ऊरभरून
घेणे, हीच तर ज्येष्ठांच्या मॉर्निंग वॉकची खरी गंमत
आणि गरज असते!
शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य
परिसरात सकाळी असे ज्येष्ठांचे अनेक समूह नियमितपणे फिरण्यासाठी येत असतात.
त्यांच्या फिरण्याच्या वाटा आणि विसाव्याची ठिकाणेही ठरलेली असतात. ठरलेल्या वेळी, ठरलेल्या
ठिकाणी ही मंडळी हमखास भेटणारच! वयाची वर्षे कितीही पुढे सरकली, तरी
मैत्रीचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नसतो. अशाच
एका प्रसन्नचित्त ज्येष्ठ मित्रमंडळींच्या ग्रुपचे, गुरुवारी
(दि. १९ नोव्हेंबर) सकाळी त्यांच्याच अनुमतीने टिपलेले छायाचित्र...
(छाया: डॉ. आलोक जत्राटकर,
जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

No comments:
Post a Comment