Wednesday, 13 July 2016

आव्हाने पेलणारे विद्यार्थी घडावेत

प्राचार्य परिषदेतील सूर; शिवाजी विद्यापीठ व 'यिन'तर्फे आयोजनकोल्हापूर, ता. १२ : प्रगत युगातील आव्हानांना तोंड देणार विद्यार्थी घडविण्याबरोबरच बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत असे शैक्षणिक धोरण हवे. केंद्र सरकारच्या प्रस्तावित धोरणांत अशा मुद्यांवरच अधिक भर हवा, असा सूर प्राचार्य परिषदेम उमटला. "सकाळ'चे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व शिवाजी विद्यापीठातर्फे मंगळवारी (ता. 12) ही परिषद झाली.
राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरु व बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे होते. सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, कार्यकारी संपादक मनाजे साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याच्या विविध भागातून प्राचार्य मोठ्या संख्येने परिषदेत सहभागी झाले.
केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या या धोरणाचा मसुदा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) उपलब्ध केला आहे. देशातील नागरिक, अभ्यासक व तज्ज्ञांनी त्यावर 31 जुलैपर्यंत सूचना द्यावयाच्या आहेत. या मसुद्यावरच प्राचार्यांची मते जाणून घेण्यासाठी ही परिषद झाली.
सर्वच प्रमुख मान्यवरांची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर मते मांडली. प्राचार्य डॉ. वसंत हेळवी यांनी शैक्षणिक मसुद्यातील प्रमुख तरतुदी उपस्थितांसमोर मांडल्या. "युपीएससी'मार्फत इंडियन एज्युकेशन सर्व्हीस या केडरमधून उच्च अधिकाऱ्यांची पदे भरणे, वैश्‍वि शिक्षणाचा विचार, माजी विद्यार्थी, पालक, उद्योग हेही हक्‍कदार असतील, "मल्टी डिसिप्लीनरी नेचर'ची विद्यापीठे हवीत, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण अशा काही महत्वाच्या तरतुदी असल्याचे त्यांनी सांगितले. साईनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संपादक साळुंखे यांनी आभार मानले.
----
प्रभारी कुलगुरु डॉ. मोरे म्हणाले...
उत्कृष्टता, समता आणि संधी ही नव्या धोरणाची त्रिसुत्री
संशोधनात्मक काम हा विद्यापीठाचा गाभा
इतर कामांचाही देशातील कुलगुरुंवर ताण हे वास्तव
परिक्षांसह इतर कामाचाच अधिक ताण
विद्यापीठांशी जास्तीत जास्त 100 महाविद्यालये संलग्न हवीत
सॅम पित्रोदांची सूचना शैक्षणिक धोरणात
शिक्षणाचा दर्जा उंचावणे हे मुख्य उद्‌दीष्ट
तंत्रज्ञानाचीही जोड शिक्षणाला मिळेल
------
मुख्य संपादक श्रीराम पवार म्हणाले...
विद्यार्थी व शिक्षकांच्या मूल्यमापनाची ठोस पध्दती हवी
या चर्चेतून सकारात्मक सार बाहेर पडेल
शिक्षणातून माणूस घडावा
शासन, शिक्षण व जगाचा बाजार यात मोठे अंतर
आता नोकऱ्या देणारी क्षेत्रे कालबाह्य होतील
नवीन नोकऱ्या भविष्यात निर्माण होतील
आजची पध्दती काही दिवसांनी कालबाह्य
नवीन तंत्रज्ञान स्वीकारावे, विद्यार्थी घडवावेत
शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल हवेत
---------
प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले...
धोरण निश्‍चित होण्याअगोदर चर्चा महत्वाची
चर्चेतील निष्कर्ष यंत्रणेपर्यंत पोचतील
ध्यमिक शिक्षणावरही अधिक लक्ष द्यावे
रोजगार ने देणारे शिक्षण; अंतर्मुख व्हावे
नव्या धोरणात कौशल्याधारीत अभ्यासक्रमावर भर
प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षणाचा एकत्रित विचार
आधुनिक तंत्रज्ञानावरही अधिक भर
------

"सकाळ'चे कौतुक
शैक्षणिक धोरणाचा मसुदा जाहीर झाल्याबरोबर "सकाळ'ने ही परिषद घेतली हे खूप चांगले झाले. सामाजिक उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढाकार घेणाऱ्या "सकाळ'चे अशा शब्दात डॉ. मोरे, डॉ. शिंदे आणि प्राचार्य हेळवी यांनी कौतुक केले. गुटख्याच्या जाहिराती दैनिकात प्रसिध्द न करण्याचा निर्णय "सकाळ'ने घेतला, याची आठवण डॉ. मोरे यांनी पुन्हा एकदा करुन दिली.
--------

No comments:

Post a Comment