कोल्हापूर, दि.5 मार्च - भौवतालच्या
बदलांकडे सकारात्मकतेने पाहिल्यास नोकरी व्यवसायांच्या संधींची जाणीव होईल, असे प्रतिपादन पुणे येथील ग्रामीण संबंध संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लोखंडे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या सेंंटर फॉर करियर गाईडन्स अँड सायकॉलॉजीकल काऊन्सेलिंग यांच्यावतीने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात पुणे येथील ग्रामीण संबंध संस्थेचेे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लोखंडे यांचे 'चेंजींग रुरल इंडीया करिअर ऑपरॉच्युनिटीज् फॉर स्टुडंटस् ऑफ हायर एज्युकेशन' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य अधिविभागप्रमुख डॉ.ए.एम.गुरव उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या सेंंटर फॉर करियर गाईडन्स अँड सायकॉलॉजीकल काऊन्सेलिंग यांच्यावतीने विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात पुणे येथील ग्रामीण संबंध संस्थेचेे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लोखंडे यांचे 'चेंजींग रुरल इंडीया करिअर ऑपरॉच्युनिटीज् फॉर स्टुडंटस् ऑफ हायर एज्युकेशन' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य अधिविभागप्रमुख डॉ.ए.एम.गुरव उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप लोखंडे |
प्रदीप लोखंडे म्हणाले, भारतामध्ये सकारात्मक बदलांसाठी मोठी ताकद आहे. त्यामुळे सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागलेली आहे. सध्या भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान, शिक्षणक्षेत्र, व्यापार तसेच शासनव्यवस्था या बाबींमध्ये अनेक बदल घडून येत आहेत. विशेषत: ग्रामीण भागांमधील बदल लक्षात घेतल्यास तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याचे दिसून येतील. तरुणंनी स्वत:च्या विचारांमधील नकारात्मकता काढून टाकल्यास त्यांना या संधींची जाणीव होईल. व्यवसायासाठी कोठेही जावून काम करण्याची मानसिकता हवी. तसेच,
कामामध्ये धोका पत्करण्याचे धैर्य हवे. जिथे जाल त्या ठिकाणची भाषा संस्कृती शिकून घेतली पाहिजे. स्वत:कडे ग्लोबल सिटीझन म्हणून पाहिल्यास दृष्टी व्यापक होईल. स्वत:च्या विकासाबरोबरच इतरांच्या विकासाचाही विचार करा. आई-वडीलांनी आपल्यासाठे केले कष्ट लक्षात ठेवा. आपल्या प्रगतीमुळे आई-वडीलांच्या चेह-यावर जो आनंद दिसणार आहे त्याचा विचार करा. वाचनाने आयुष्याची समज वाढेल म्हणून भरपूर वाचन करा. जगामध्ये जे चांगले बदल घडत आहेत त्यांचा स्विकार करा व नकारात्मकात काढन टाका. मी,
वाई तालुक्यातील एका खेडयामध्ये वाढलो. अत्यंत गरिब परिस्थीतीमध्ये शिक्षण घेवून आज जगातील 29 देशांमध्ये फिरुन मी कार्य करीत आहे आणि माझे ज्ञान वाढवून घेतले आहे. भारतातील विविध क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग आशादायक आहे. महिला त्यांच्या सामर्थ्यांने देशामध्ये बदल घडवू शकतात.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना वाणिज्य अधिविभागप्रमुख डॉ.ए.एम.गुरव म्हणाले, विद्यार्थी हे संकल्पनांचे विक्रेते झाले पाहिजेत. त्यांनी प्रगल्भतेने विचार करायला शिकले पाहिजेत. नियमितपणे वाचन, सकारात्मक विचार हे यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केंद्राच्या समन्वयक श्रीमती डॉ.जी.एस.पाटील यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव यांंनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विविध अधिविभागातील प्राध्यापक, विद्याथी, विद्यार्थींनी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment