कोल्हापूर, दि.8 मार्च - समाजामधील आर्थिक उन्न्तीचा विरोधाभास हा सामाजिक प्रगतीमधील मुख्य अडथळा आहे. या विरोधाभासाची दरी कमी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक कार्य केले पाहिजेत, असे प्रतिपादन पेण, मंुबई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां डॉ.वैशाली पाटील यांनी केले.
डावीकडून कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, डॉ.भारती पाटील, डॉ.डी.आर.मोरे, डॉ.आर.व्ही.गुरव, डॉ.वैशाली पाटील, डॉ.प्रतिभा देसाई, श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, प्र-कुलगुरु
डॉ.डी.टी.शिर्के
|
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये बेटी बचाव अभियानांतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये डॉ.वैशाली पाटील बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के उपस्थित होते. तसेच, श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.वैशाली पाटील |
यावेळी श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती आपल्या मनोगतामध्ये म्हणाल्या, सशक्त समाज घडविण्यामध्ये स्त्रीयांचे फार मोठे योगदान आहेे. त्यामुळे स्त्रीयांनी स्वत:ला अबला समजू नये. समाज बळकट करण्यासाठी विचारांची वाईट प्रवृृती नष्ट केली पाहिजे. त्याची सुृरुवात घरापासूनच झाली पाहिजे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के म्हणाले, प्रत्येक दिवस हा महिला सन्मान दिवस असतो. विद्यापीठामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना प्राधान्याने वसतिगृह उपलब्ध करुन दिला जातो. त्यामुळे मुलींंची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होत आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयीका डॉ.प्रतिभा देसाई यांनी केले. सूत्रसंचालन भूगोल अधिविभागाच्या डॉ.मीना पोतदार यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक व प्रशासकीय सेवक मोठयाप्रमाणात उपस्थित होते.
------
No comments:
Post a Comment