शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यान प्रसंगी (डावीकडून)
डॉ.निलीशा देसाई, डॉ.निलांबरी जगताप, प्राचार्य डॉ.ए.बी.राजगे, डॉ.एन.डी.पारेकर, डॉ.चंद्रकांत अभंग.
|
शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन, सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि छत्रपती शाहूमहाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'राजमाता अहिल्याबाई होळकर-जीवन व कार्य' या विषयावर दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामध्ये करण्यात आले होते. या परिसंवादाच्या उद्धाटन प्रसंगी उद्धाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चंद्रकांत अभंग बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.बी.राजगे उपस्थित होते.
डॉ.चंद्रकांत अभंग |
शेतीच्या कामामध्ये परिवर्तन करणे, भिल्लांना
राज्यव्यवस्थेमध्ये सामावून घेण्याची दखल त्यांनी घेतली. महेश्वर या ठिकाणच्या नदीघाट व मंदिरांचे
काम जवळ जवळ 20 ते 30 वर्षे
सुरु होते. यामाध्यमातून तेथील लोकांना रोजगार उपलब्ध होत होता. महेश्वरमध्ये अहिल्यादेवींनी महाराष्ट्रपध्दतीचा किल्ला निर्माण केला. अहिल्यादेवींनी गुजरात मधून विणकर आणले त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला त्यामुळे महेश्वरीसाडीची ख्याती संपूर्ण भारतभर निर्माण झाली. महाराष्ट्र राज्याबाहेरही मराठयांचे फार मोठे कर्तुत्व होते. अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगली व्यवस्था निर्माण केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. ए. बी. राजगे म्हणाले, अहिल्यादेवी
होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिध्द होत्या. अहिल्यादेवींनी अनेक मंदिरे व नदीघाट
बांधले किंवा त्यांचा जीर्णोध्दार केला. महेश्वर व इंदूर
या गावांना त्यांनी सुंदर बनवले. अहिल्यादेवींनी रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. कारागीर, मूर्तिकारांना
त्यांनी सन्मान दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास अधिविभागप्रमुख डॉ.एन.डी.पारेकर, कार्यक्रमाचे
संयोजक डॉ.निलांबरी जगताप यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. संयोजक डॉ.निलीशा देसाई यांनी आभार मानले. डॉ.अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी यशपाल धिंडे, विनयाताई
करपेकर, दशरथ
पारेकर, डॉ.अवनिश
पाटील, श्रीमती
छाया राजे यांचेसह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजिक
कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment