Tuesday 1 May 2018

शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात



कोल्हापूर, दि. 1 मेमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58वा वर्धापनदिन अर्थात महाराष्ट्र दिन शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment