Thursday, 29 November 2018

थाळीफेक सुवर्णविजेत्या कीर्तीकुमारचे कुलगुरूंकडून अभिनंदन

मंगळूर येथे झालेल्या राष्ट्रीय थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या कीर्तीकुमार बेनके याचे अभिनंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत डॉ. पी.टी. गायकवाड व आर.टी. पाटील.


पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून फैजाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यापीठाच्या महिला खो-खो संघासमवेत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. डॉ. पी.टी. गायकवाड, प्रा. हर्षवर्धन पाचोरे, प्रा. दत्ता मोहिते.


खो-खो महिला संघास राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा
कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: मंगळूर येथे झालेल्या अखिल भारतीय थाळीफेक स्पर्धेत सुवर्णपदक विजेता खेळाडू कीर्तीकुमार जयप्रकाश बेनके आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव येथे झालेल्या पश्चिम विभागीय महिला आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक संपादन करणारा शिवाजी विद्यापीठाचा संघ यांचे आज शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी अभिनंदन केले.
मंगळूर विद्यापीठ, मंगळूर (मोडबीद्री) येथे झालेल्या खिल भारतीय थाळीफेक स्पर्धे (२०१८-१९) चंदगड येथील र.भा. माडखोकर महाविद्यालयाचा खेळाडू कीर्तीकुमार जयप्रकाश बेनके याने (५३.५९ मी.) सुवर्णपदक प्राप्त केले. कोवाड येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्रशिक्षक प्रा.आर.टी.पाटील तसेच कडेगाव येथील कन्या महाविद्यालयाच्या संघ व्यवस्थापक सौ. शिफा मोहिते यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
त्याचप्रमाणे पश्चिम विभागीय महिला आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त करून फैजाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या विद्यापीठाच्या महिला खो-खो संघालाही कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धा ७ ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहेत. संघात करिष्मा रिकीबदार, अमृता कोकीकर,तुजा खाडे, पूजा फातले, ज्योती शिंदे, तनुजा शिंदे, सन्मती कोल्हे, कोमल शिंदे, मोनिका झेंडे, धनश्री भोसले, करिष्मा नगारजी, पल्लवी मर्डी यांचा समावेश आहे. संघ मार्गदर्शक प्रा.हर्षवर्धन पाचोरे, संघ व्यवस्थापक प्रा.दत्ता मोहिते आहेत.
यावेळी विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, श्री. आर.टी. पाटील उपस्थित होते.


No comments:

Post a Comment