पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा:
शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूला बाद करण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करणारा मुंबई विद्यापीठाचा खेळाडू. |
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते विजेतेपदाचा चषक स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचा संघ |
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते उपविजेतेपदाचा चषक स्वीकारताना मुंबई विद्यापीठाचा संघ. |
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते तृतीय क्रमांकाचा चषक स्वीकारताना औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ. |
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते चतुर्थ क्रमांकासाठीचा चषक स्वीकारताना कोटा (राजस्थान) येथील कोटा विद्यापीठाचा संघ. |
कोल्हापूर, दि. ३०
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात गेले पाच दिवस सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ
पुरूष कबड्डी स्पर्धेत आज यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने मुंबई विद्यापीठास
२९-२१ असे नमवित अव्वल स्थान पटकावले.
स्पर्धेच्या प्रथम
क्रमांकासाठीची लढत शिवाजी विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाच्या संघांत झाली. अतिशय
अटीतटीने सुरू असलेला हा सामना संपण्यास अवघी काही मिनिटे शिल्लक असताना पंचांच्या
एका निर्णयाला आक्षेप घेत मुंबई विद्यापीठाच्या संघाने सामना सोडला. त्यामुळे
२९-२१ अशा आठ गुणांनी आघाडीवर असलेल्या शिवाजी विद्यापीठास विजयी घोषित करण्यात
आले. या संपूर्ण स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाचा संघ अजिंक्य राहिला आणि साखळी
फेरीतील तीनही सामने जिंकून सहा गुणांसह गुणतक्त्यात आघाडीचे स्थान प्राप्त केले.
तिसऱ्या
क्रमांकासाठीचा सामना औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि राजस्थानचे
कोटा विद्यापीठ यांच्यात रंगला. पहिल्या गुणापासून ते अखेरच्या गुणापर्यंत हा
सामना अत्यंत चुरशीचा झाला. अगदी बरोबरीने हलणाऱ्या गुणफलकाने प्रेक्षकांना श्वास
रोखून धरायला लावले. अखेरच्या मिनिटातही सामना ३८-३८ असा बरोबरीत होता. अगदी
अखेरच्या चालीत एक गुण मिळवून औरंगाबाद विद्यापीठाने हा सामना ३९-३८ असा अवघ्या
एका गुणाने जिंकला.
सामन्यांनंतर लगेचच राष्ट्रीय
फेरीसाठी पात्र ठरलेल्या साखळी फेरीतील चारही संघांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू
डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या
प्रमुख उपस्थितीत चषक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक
वितरणानंतर भारतीय विद्यापीठ महासंघ (ए.आय.यु.) आणि शिवाजी विद्यापीठ यांचे ध्वज
अनुक्रमे प्रा. सुनील खराडे आणि प्रा. विजय रोकडे यांनी सन्मानपूर्वक उतरविले आणि
कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सोपविले.
यावेळी कुलसचिव डॉ.
विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक
सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, संजय जाधव, प्रा. संभाजी पाटील, डॉ.
रमेश भेंडेगिरी, उमा भेंडेगिरी-भोसले, डॉ. बाबासाहेब उलपे, अजित पाटील यांच्यासह
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. दीपक पाटील
यांनी स्वागत केले, तर क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांनी आभार
मानले.
जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्य
पश्चिम विभागीय
आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धा गेल्या पाच दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या
लोककला केंद्रात मॅटवर खेळविली गेली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये विद्यापीठ
प्रशासनाच्या बरोबरीने कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनने अत्यंत महत्त्वाची
भूमिका बजावली. स्पर्धेला आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्याबरोबरच स्कोअरर आणि पंच
म्हणूनही संघटनेच्या सदस्यांनी महत्त्वाचे योगदान दिले.
स्पर्धेचे यशस्वी
आयोजन करण्यामध्ये डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ.
बाबासाहेब उलपे, डॉ. एन.डी. पाटील, प्रा. सुनील खराडे, प्रा. विजय रोकडे, डॉ.
सुनील चव्हाण, श्री. संभाजी पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले.
विजेत्या शिवाजी विद्यापीठ संघातील सदस्य
पश्चिम विभागीय
आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या शिवाजी विद्यापीठ संघातील
खेळाडू (कंसात महाविद्यालय) असे:- अक्षय प्रकाश निकम (के.एन.पी. महाविद्यालय, वाळवा), राहुल
अनिल वडार (के.बी.पी. महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर), सौरभ रविंद्र कुलकर्णी (के.बी.पी.
महाविद्यालय, उरुण-इस्लामपूर), ऋषीकेश संभाजी देसाई-कौजलगी (राजर्षी छत्रपती शाहू
महाविद्यालय, कोल्हापूर), निखील भीमराव पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय,
कोल्हापूर), सौरभ तानाजी पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर),
अक्षय देवानंद पाटील (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), साईनाथ
महादेव कोंडुसकर (राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, कोल्हापूर), रोहित पुरूषोत्तम
पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आसुर्ले-पोर्ले), अनिकेत बाबासाहेब
चव्हाण (यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर), संकेत राजू माने (नाईट
कॉलेज ऑफ आर्ट्स अॅन्ड कॉमर्स,
इचलकरंजी) आणि रोहन विजय शिंगाडे (कृष्णा महाविद्यालय,
रेठरे-बुद्रुक). संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. रमेश भेंडेगिरी आणि व्यवस्थापक म्हणून
डॉ. बाबासाहेब उलपे यांनी काम पाहिले.
प्रेक्षक गॅलरीत कुलगुरूंसह अधिकारी
शिवाजी विद्यापीठ
आणि मुंबई विद्यापीठ यांच्यातील पहिल्या क्रमांकासाठीच्या सामन्यास कुलगुरू डॉ.
देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. सामना सुरू करून दिल्यानंतर
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी थेट प्रेक्षक गॅलरीकडे कूच केले आणि विद्यार्थ्यांसमवेत
गॅलरीत बसून त्यांनी या सामन्याचा आनंद लुटला. यावेळी त्यांच्यासमवेत प्र-कुलगुरू
डॉ. शिर्के यांच्यासह अन्य अधिकारीही होते.
अंतिम गुणतक्ता
संघ
|
विजय
|
पराजय
|
गुण
|
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
|
०३
|
००
|
०६
|
मुंबई विद्यापीठ, मुंबई
|
०२
|
०१
|
०४
|
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
औरंगाबाद
|
०१
|
०२
|
०२
|
कोटा विद्यापीठ, कोटा
|
००
|
०३
|
००
|
No comments:
Post a Comment