वीर नर्मद गुजरात विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ या संघादरम्यान झालेल्या सामन्यातील एक क्षण. |
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धा:
कोल्हापूर, दि. २७
नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेत
आज दुसऱ्या दिवशी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर
विजय मिळवित पुढील फेरीत प्रवेश केला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात मॅटवर हे
सामने सुरू आहेत.
आज सकाळच्या सत्रात
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मणिपाल विद्यापीठ,
मणिपाल यांच्यात सामना झाला. एकतर्फी झालेला हा सामना औरंगाबादच्या संघाने ६३-०६
असा सुमारे ५७ गुणांनी जिंकला. नांदेड विद्यापीठाच्या संघाची लढत गुजरात
विद्यापीठाशी झाली. नांदेडने हा सामना ४१-१२ असा २९ गुणांनी जिंकला.
आज (दि. २७) रोजी
झालेल्या इतर सामन्यांचे निकाल (कंसात गुण) पुढीलप्रमाणे असे: वीर नर्मद दक्षिण गुजरात
विद्यापीठ वि.वि. स्वर्णीम गुजरात क्रीडा विद्यापीठ, गांधीनगर (४१-३८), महाराजा
छत्रसाल बुंदेलखंड विद्यापीठ, छत्रपूर (म.प्र.) वि.वि. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठ, परभणी (पुढे चाल), एल.एन.आय.पी.ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर वि.वि. संदीप
युनिव्हर्सिटी, नाशिक (५६-३१), सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट वि.वि. तांटिया
विद्यापीठ, गंगानगर (राजस्थान) (पुढे चाल), महाराज सूरजमल ब्रिज विश्वविद्यालय
विद्यापीठ, भरतपूर वि.वि. राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, अजमेर (पुढे चाल), राजीव
गांधी विद्यापीठ, भोपाळ वि.वि. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (पुढे चाल),
मोहनलाल सुखोडिया विद्यापीठ, उदयपूर वि.वि. राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर (५८-१९),
गोवा विद्यापीठ, पणजी वि.वि. पॅसिफिक अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन एन्ड रिसर्च,
उदयपूर (४१-३०), हेमचंद्र उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण (गुजरात) वि.वि. सरदार
पटेल विद्यापीठ, वल्लभ विद्यानगर, गुजरात (३५-२६), राजस्थान विद्यापीठ, जयपूर
वि.वि. महाराज गंगासिंह विद्यापीठ, बिकानेर (४२-४०).
दरम्यान, काल उद्घाटन
समारंभानंतर रात्री विद्युतझोतात रंगलेल्या सामन्यांचे निकाल पुढीलप्रमाणे:-
भारती विद्यापीठ,
पुणे वि.वि. कच्छ विद्यापीठ, गुजरात (३४-१४), गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ,
अहमदाबाद वि.वि. डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठ, सागर (४४-२२), देवी अहिल्या
विद्यापीठ, इंदोर वि.वि. एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुणे (५१-१७), कोटा
विद्यापीठ, कोटा वि.वि. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा (३८-१८), भूपाल नोबल
विद्यापीठ, राजस्थान वि.वि. गोविंद गुरू ट्रायबल विद्यापीठ, बन्सवारा (७१-३८),
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली वि.वि. माधव विद्यापीठ, पिंडवारा (पुढे चाल),
बरकतुल्ला विद्यापीठ, भोपाळ वि.वि. निरमा विद्यापीठ, अहमदाबाद (पुढे चाल), विक्रम
विद्यापीठ, उज्जैन वि.वि. श्री गोविंद गुरू विद्यापीठ, गुजरात (५३-०७), गुजरात विद्यापीठ,
अहमदाबाद वि.वि. राजर्षी भतृहरी मत्स्य विद्यापीठ, अलवार (४०-२९), पारुल
विद्यापीठ, गुजरात वि.वि. सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणे (पुढे चाल), राणी दुर्गावती
विद्यापीठ, जबलपूर वि.वि. जिवाजी विद्यापीठ, ग्वाल्हेर (५३-११)
No comments:
Post a Comment