लक्ष्मीपुरी येथे स्वच्छता मोहिमेस प्रारंभ प्रसंगी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक. |
लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक |
लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक |
लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक |
लक्ष्मीपुरी येथे स्वच्छता मोहिमेअंतर्गत सफाई करताना प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील |
लक्ष्मीपुरी येथील गल्ल्यांमध्ये स्वच्छता मोहिम राबविताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक |
कुंभार गल्ली येथे स्वच्छा मोहिमेअंतर्गत सफाई करताना कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी आणि कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे |
कुंभार गल्ली येथे स्वच्छता करताना शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक |
कोल्हापूर, दि. १५ ऑगस्ट: शहर परिसरात
महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने
आजपासून शहरात स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. आज दिवसभरात पुराचे पाणी
घुसून नुकसान झालेल्या सुमारे तेरा महाविद्यालयांच्या चमूने ठिकठिकाणी स्वच्छता
मोहीम राबविली.
आज सकाळी स्वातंत्र्यदिनाचे ध्वजवंदन झाल्यानंतर
शिवाजी विद्यापीठासह शहरातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या
सुमारे एक हजार स्वयंसेवकांनी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. लक्ष्मीपुरी येथे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास
नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, वित्त व
लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी
विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के.
गायकवाड, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. अमोल मिणचेकर, एनएसएस शहर समन्वयक डॉ. शिवाजी
जाधव यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिमेस औपचारिक प्रारंभ करण्यात आला. सुरवातीला
स्वयंसेवकांना हातमोजे, मास्क, गमबूट तसेच अन्य स्वच्छता साहित्याचे वाटप करण्यात
आले. रोटरी क्लबच्या वतीनेही स्वयंसेवकांना टोप्या व स्वच्छता साहित्य देण्यात
आले. त्यानंतर मोहिमेस सुरवात करण्यात आली.
लक्ष्मीपुरी येथे रिलायन्स मॉलच्या परिसरातील
विविध गल्ल्यांमध्ये पुराच्या पाण्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, दुकानांसह
रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखलाचे थर साचले आहेत. राष्ट्रीय सेवा योजना तसेच
विद्यापीठाच्या एमएसडब्ल्यूच्या स्वयंसेवकांनी हा सारा मलबा घरांतून, गल्ल्यांतून
बाहेर काढून मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आला. तुंबलेली गटारे मोकळी करण्याबरोबरच
अन्य स्वच्छतेची कामे करण्यात आली.
राजाराम कॉलेज, कमला कॉलेज व न्यू कॉलेजच्या एनएसएस
स्वयंसेवकांच्या व छात्रसैनिकांच्या वतीने तसेच किर्लोस्कर ऑईल इंजिनच्या
कर्मचाऱ्यांतर्फे कुंभार गल्ली (शाहूपुरी) परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह कोल्हापूर
महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी, प्राचार्य डॉ. व्ही.एम. चव्हाण यांनीही
स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या वेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनीही भेट देऊन
सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेची पाहणी केली व मोहिमेत सहभागी स्वयंसेवकांचे
अभिनंदन केले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह
सेवाभावी नागरिक, संस्था तसेच महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणाही पूर्ण तयारीनिशी
उतरल्याचे दिसत आहे.
आज सकाळच्या सत्रात स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली
ठिकाणे अशी: हुतात्मा बाग परिसर (गोपाळकृष्ण गोखले कॉलेज),
दसरा चौक परिसर (श्री शहाजी छत्रपती कॉलेज), न्यू पॅलेस परिसर (महावीर कॉलेज),
सिद्धार्थनगर परिसर (नाईट कॉलेज व डी.आर.के. वाणिज्य कॉलेज), दुधाळी व पंचगंगा घाट
परिसर (यशवंतराव चव्हाण कॉलेज), शुक्रवार पेठ परिसर (डी.डी. शिंदे कॉलेज), रमणमळा
परिसर (विवेकानंद कॉलेज), बावडा परिसर (डॉ. डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज),
कदमवाडी परिसर (राजर्षी शाहू कॉलेज).
यापुढील काळातही सदर परिसरांत संबंधित
महाविद्यालयांतर्फे स्वच्छता मोहिम सुरूच राहील. तसेच, त्यानंतर जिल्ह्यातील विविध
पूरग्रस्त गावांमध्ये जाऊनही स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे कुलगुरू
डॉ. शिंदे यांनी सांगितले.
सिद्धार्थनगरातील
काव्यांजलीला शैक्षणिक साहित्य
एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना सिद्धार्थनगर
येथील काव्यांजली संजय कांबळे या बालिकेला आपले दप्तर, पुस्तकं पुराच्या पाण्यानं
भिजून खराब झाल्याचे सांगताना रडू कोसळले. खरे तर काव्यांजलीचे घरच या पुराने पडले
आहे. पण, तिची तगमग मात्र पुस्तकांसाठी होती. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते डॉ.
प्रवीण कोडोलीकर यांनी तिला शैक्षणिक साहित्य देण्याचा निश्चय केला. तिच्यासारख्या
सिद्धार्थनगरातील अन्य बालकांनाही त्यांनी शैक्षणिक साहित्य देण्याचे ठरविले. आज
शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते व प्र-कुलगुरू डॉ.
डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी परीक्षा संचालक गजानन पळसे,
वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, एनएसएस समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, व्यवस्थापन
परिषद सदस्य डॉ. रसूल कोरबू यांच्या उपस्थितीत सिद्धार्थनगरातील समाज मंदिरात हे
साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर कुलगुरुंसह विद्यापीठाच्या सर्वच
पदाधिकाऱ्यांनी सिद्धार्थनगर परिसरात फिरून पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती
घेतली व आपत्तीग्रस्त नागरिकांचे सांत्वन केले.
सिद्धार्थनगर परिसराला आपत्तीच्या क्षणी
विद्यापीठातील आपल्या सर्व वरिष्ठ सहकाऱ्यांसमवेत भेट देऊन नागरिकांना दिलासा
देणारे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे पहिलेच कुलगुरू आहेत, अशी भावना यावेळी
सिद्धार्थनगरवासियांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment