शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक सुप्रिया कुसाळे यांचे कुलगुरूंकडून अभिनंदन
Supriya Kusale |
संपूर्ण भारतातून आलेल्या विविध व नाविन्यपूर्ण प्रवेशिकांमधून राजाराम महाविद्यालयात संशोधन करीत असलेल्या सुप्रिया
कुसाळे यांच्या 'इकोफ्रेंडली अँड कॉस्ट एफेक्टिव्ह
प्रॉडक्शन ऑफ फायटेज प्रोड्युसिंग बायोईनॉक्लन्ट अँड इस्ट इफिकसी इन फील्ड'
या संशोधनास वाखाणण्यात आले. त्यांनी
पर्यावरणपूर्वक, किफायती फायटेज
तयार करण्याची क्षमता असलेले जैविक खत तयार केले आहे. गेली तीन वर्षे सुरु
असलेल्या या संशोधनांतर्गत या खतामुळे ऊस, मका, मिरची, आले, हळद, ज्वारी, व भात या पिकांची गुणवत्ता वाढण्यासोबतच मातीची
सुपीकता देखील वाढल्याचे दिसून आले.
गेल्या जानेवारीत मुंबई येथे
झालेल्या आंतरविद्यापीठ संशोधन स्पर्धा 'आविष्कार'मध्ये सुप्रिया शिवाजी विद्यापीठाकडून सहभागी झाल्या. त्यांच्या संशोधनास तेथे प्रथम क्रमांकाचे
पारितोषिक मिळाले. फेब्रुवारीत मुंबई येथेच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही या संशोधनास प्रथम क्रमांक मिळाला. भोपाळ येथे मार्चमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय
स्पर्धेत सुप्रिया कुसाळे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार होत्या. परंतु कोविड-१९ च्या परिस्थितीमुळे सदर स्पर्धा डिसेंबरमध्ये ऑनलाईन पद्धतीने
आयोजित करण्यात आली. बुधवार, दि. १६ डिसेंबर रोजी स्पर्धेचा
अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
या संशोधनासाठी तिला शिवाजी
विद्यापीठातील डॉ. पंकज पवार, डॉ. शशीभूषण महाडिक, राजाराम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब खेमनर,
सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख व मार्गदर्शक डॉ. यास्मिन आत्तार, प्रा. शोभना भोसले व
प्रा. शहनाज फारुकी यांचे मार्गदर्शन लाभले. आई सौ. शोभा, वडील श्री.
प्रकाश कुसाळे व भाऊ प्रतीक व प्रा. गणपती सूर्यवंशी यांची साथ मिळाली.
No comments:
Post a Comment